जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर शहर मुस्लिम संघटनेच्या वतीने आज SIR मॅपिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांना मतदार यादीतील नोंदी तपासण्यासाठी तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संघटनेतर्फे जुन्नर शहरातील सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात आले की, संघटनेच्या माध्यमातून SIR प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या 2002 च्या मतदार यादीत आपल्या आई-वडिलांची नावे शोधून कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत. तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याकडे जमा करावीत.
जर कोणत्याही व्यक्तीला या प्रक्रियेत अडचण येत असेल, तर त्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा करून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
या कॅम्पला जुन्नर येथील नगरसेवक अकिब इनामदार, नगरसेवक वाजीद इनामदार, राजू तौसिफ अत्तार, इम्रान तकी तसेच धर्मगुरू रिजवान मौलाना उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
.png)