MGID Header Code
Code End

वर्षभरापासून पेन्शन मिळत नाही. कष्टकरी पेन्शनर कामगाराचा काय दोष

 


PCMC  मागील आठ वर्षापासून टाटा मोटर्सच्या निवृत कामगारांचा वाढीव पेन्शन मिळावी, यासाठी लढा सुरू आहे.

आक्टोंबर २०१९ मधे टाटा मोर्टस कंपनीने स्वतःची TEPS पेन्शन स्कीम EPFO कडे सरंडर करण्याचा असफल प्रयत्न केला. त्यानंतर असे ठरले की पेन्शन स्कीम EPFO कडे सरेंडर होई पर्यंत रिटायर्ड होणाऱ्या कामगाराला वय वर्षे ६० पुर्ण झाल्यानंतर इंटरीम पेन्शन कंपनी देईल.म्हणून आक्टोबर २०१९ पासून कामगाराला पुर्वी सारखे LIC द्वारे पेन्शन मिळत नाही तर त्याला टाटा मोटर्स तर्फे इंटरीम पेन्शन मिळते.

 याचवेळी  टाटा मोटर्स मधील कामगारांना सुद्धा  इतर कंपन्यांमधील कामगारां प्रमाणे वय वर्षे ५८ पूर्ण झाल्या नंतर पेन्शन मिळावे या साठी "रिटायर्ड कामगार पेन्शनर कमीटीने" फार मोठा संघर्ष केला. सतत चार ते पाच वर्ष विविध सरकारी पातळ्यांवर ५८ वर्षांनंतरच्या पेन्शन साठी लढा दिल्या नंतर,  'टेल्को एम्प्लॉईज पेन्शन ट्रस्ट' ने मीटींग घेऊन मार्च २०२३ पासून  युनियन ट्रस्टी आणि मॅनेजमेंट ट्रस्टींनी  कामगाराला वयाची ५८ वर्ष पूर्ण केल्या नंतर पेन्शन देण्यास मान्यता दिली. यानंतर दिल्ली हायकोर्टात कामगारांच्या पेन्शन विषयी सप्टेंबर २०२३ मधे दोन वेगवेगळ्या केस दाखल करण्यात आल्या

W.P. 12292/2023 ही मॅनेजमेंटची केस आहे - टाटा मोटर्सचा Exempted Trust सरेंडर करा आणि EPFO ने आमचा पेंशन फंड ताब्यात घ्यावा.

W.P. 12327/2023 ही युनियनची केस आहे - कामगारांना पूर्ण पगारावर हायर पेंशन मिळावी.

१ जुलै २०२५ पासून ज्या कामगारांनी कंपनीकडे पेन्शन साठी लेखी मागणी केली त्यांना कंपनीने इ-मेल द्वारे कळवले की,

 TML (टाटा मोटर्स लिमिटेड) आता 1 जुलै 2025 पासून EPS (कर्मचारी पेन्शन योजना) साठी सूट नसलेली आस्थापना झाली आहे. परिणामी, TEPS फंड अंतर्गत जो पेन्शन निधी ठेवण्यात आला होता, तो 30 जून 2025 रोजी EPFO कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

टाटा मोटर्स लिमिटेड EPFO कडे पेन्शन सूट परत करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे, त्यानुसार TML च्या सर्व कार्यरत आणि निवृत्त/सेवा सोडलेल्या कर्मचाऱ्यांचा संपूर्ण EPS निधी आणि सेवा संबंधित EPFO कार्यालयाकडे हस्तांतरित केली जाईल.

एकदा पेन्शन सरेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली की, कर्मचारी पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.

आम्ही आपणास विनंती करतो की तोपर्यंत आपण सहकार्य करावे.

सोप्या शब्दात याचा अर्थ:  टाटा मोटर्सचा स्वतःचा पेन्शन फंड होता, तो आता सरकारच्या EPFO कडे जमा केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करू शकाल. म्हणजेच पेन्शन सरेंडर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.

आज  २०२६ चा ऑगस्ट महिना संपत आलेला आहे. जोपर्यंत पेन्शन सरेंडरची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत ईपीएफओ पेन्शन देणार नाही असे दिसते.

१ जुलै २०२५ पासून वयाची ५८ वर्षे पुर्ण झालेला कामगार पेन्शन न घेता  सहकार्यच करत आलेला आहे. गेले १३ महिने युनियन  त्याला "पेन्शन लवकरच सुरू होईल" असे अश्वासन देत आहे. पण त्याच्या पेन्शन साठी युनियन व्यवस्थापनाला जाब कधी विचारणार.  खरे तर सरेंडरची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत आपल्या कामगारांना कंपनीने पेन्शन देणे अपेक्षित होते. तसे ठरले सुद्धा होते. युनियनने गेले १३ महिने या मुद्याकडे डोळेझाक केलेली दिसते.

जो कामगार  सामान्य पेन्शन साठी पात्र होतो त्या कामगाराने कंपनीची ३०-४० वर्षे इमाने इतबारे सेवा केलेली असते. रिटायर्ड झालेला कामगार हा युनियनच्या उपयोगी नसतो हा चुकिचा समज आहे. ५८ वर्षे पुर्ण केलेला कामगार पुढील दोन वर्षे कंपनीसाठी घाम गाळणार आहे. सोशल सिक्युरीटी फक्त नावालाच नसावी.आपल्याच कामगारासाठी त्याची न्याय पेन्शन मिळावी म्हणून कामगारांननी निवडून दिलेले युनियन ट्रस्टी योग्य ठिकाणी म्हणजेच  कंपनीकडे पाठपुरावा करतांना दिसत नाहीत.तर कामगारांचे युनियन ट्रस्टी ही मागणी कोर्टाद्वारे EPFO कडे करुन कामगारांची दिशाभुल करत आहेत.

  प्रशांत पोमण

    माजी युनियन प्रतिनिधी

   टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुणे

थोडे नवीन जरा जुने