PCMC : महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांतूनच हवेचा प्रदूषण

 


पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसाठी राबवण्यात येणाऱ्या कचरा संकलन मोहिमेतील गाड्यांमधूनच हवेचा प्रदूषण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. महानगरपालिकेच्या अनेक कचरा गाड्या जुन्या असल्यामुळे त्यातून काळा धूर मोठ्या प्रमाणात निघत आहे. याशिवाय काही गाड्यांमध्ये कचरा उघड्यावर वाहून नेल्याने त्यातून दुर्गंधी व धूळकण हवेत मिसळून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. पर्यावरणप्रेमी संघटनांनी या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी केली आहे. जुन्या गाड्यांच्या ऐवजी प्रदूषणमुक्त CNG किंवा इलेक्ट्रिक गाड्या वापरणे, तसेच कचरा वाहतुकीसाठी झाकण असलेले कंटेनर वापरणे, ही तातडीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 - शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते 


थोडे नवीन जरा जुने