पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पद्मश्री नारायण सुर्वे यांनी मराठी साहित्यात कामगार वर्गाची आणि समाजातील उपेक्षित वर्गांची वाचा फोडली. त्यांच्या कवितांमुळे कामगार जीवन आणि समाजातील विषमतेवर आणि अन्यायावर प्रकाश पडला.त्यांची कविता आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देते. सुर्वेंनी कामगार जीवन मांडले असे मत काम करण्याचे काशिनाथ नखाते व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश माने, सलीम डांगे, सुनील भोसले, मंगेश पालके, सुनील गायकवाड, सामसुद्दीन शेख, बाळू काळे, यास्मिन पठाण, लक्ष्मी बाजवी, सतीश शेंडे, स्वाती मोरे, रंजना शिंदे, सुवर्णा कोरे आदी उपस्थित होते.
मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कवी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून नारायण सुर्वे यांचं महत्व अनेक पैलूंमध्ये दिसत आहे.
नारायण सुर्वे हे कामगार वर्गाचे प्रसिद्ध कवी म्हणून मान्यता आहे. त्यांनी गिरणी कामगारांच्या जीवनातील कष्ट, वेदना आणि शोषण यांचं ज्वलंत चित्रण आपल्या कवितांमध्ये केलं. त्यांच्या कवितांमधून कामगारांची वेदना आणि अन्याय समाजापर्यंत पोहोचला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.नारायण सुर्वे कविता पुस्तक नाहीत तर ती कामगारांना प्रेरणा आणि लढण्याची जिद्द देणारे आहेत असे मत नखाते यांनी व्यक्त केले.