जुन्नर (आनंद कांबळे) : येथील जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर चे प्राचार्य मा. प्रा. गणेश शिवाजी आहेर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय राजगुरुनगर (खेड) या ठिकाणी संपन्न झाला.
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर संघाने सदर पुरस्कार सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपद पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी भूषविले, खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे, भगवान पोखरकर, तनुजाताई घनवट यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. गणेश शिवाजी आहेर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष राहुल जोशी, सेक्रेटरी ॲड. अविनाश थोरवे व कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख व माजी कार्याध्यक्ष नितीन मेहता तसेच सर्व कार्यकारी मंडळ सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास रेटवडे यांनी केले व उत्तमराव पोटवडे यांनी आभार मानले.
Prof. Ganesh-Aher-honored-with-District-Level-Meritorious-Teacher-Award