नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता




- भाजपा महायुती सरकारकडून अधिकृत 'जीआर' प्रसिद्ध 

- मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष, आमदार लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी- चिंचवड - पिंपरी-चिंचवडकरासंह तमाम वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे  लवकरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ या अभियानामध्ये ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत राहिला. राज्य शासनाची पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक पुढाकार घेतला.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता घेण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य स्तरीय तांत्रिक समितीची मान्यता देण्यासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतला.  सुमारे 1 हजार 200 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. आता पहिल्या टप्प्यात 525 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचा 'जीआर' आज प्रसिद्ध झालेला आहे.

पर्यावरण प्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव… 

शहर आणि परिसरातील पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना महानगरपालिकेच्या Master plan मध्ये दर्शवल्यानुसार विविध ठिकाणी 60 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र सदर कामामध्ये प्रस्तावित केले आहे. तसेच, Water ATM, Public Toilet, Street Furniture, Chain link fencing compound wall आणि बायोडायव्हर्सिटी पार्क इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारच्या वतीने प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याचे ‘मिनिट्स’ महापालिका प्रशासनाला मिळाले आहेत. केंद्र सरकारच्या अमृत- 2 उपक्रमांतर्गत या प्रकल्पाचे काम होणार आहे.

प्रतिक्रिया : 

"इंद्रायणी नदी केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर आपली संस्कृती, पर्यावरण आणि शहराच्या आरोग्याशी थेट जोडलेली जीवनवाहिनी आहे. नदी सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली.  डिसेंबर- 2025 पासून या प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे यासाठी आभार व्यक्त करतो. या प्रकल्पाद्वारे इंद्रायणी नदीला नवजीवन मिळेल, प्रदूषणमुक्त व सुरक्षित किनारे तयार होतील, तसेच नागरिकांना हरित व सुंदर नदीकाठाचा अनुभव मिळेल. आम्ही हा प्रकल्प वेळेत व गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

थोडे नवीन जरा जुने