पुणे: मंथन फाउंडेशनने बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी खास दिवाळी उपक्रम राबवला. महिलांना दिवाळी फराळ, मिठाई आणि महिनाभर पुरेल राशन मिळाले, तर मुलांना नवीन कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर म्हणतात, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, आणि या उपक्रमाद्वारे समाजापासून बहिष्कृत महिलांच्या जीवनात थोडीशी आनंदाची आणि आशेची झळक निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
उपक्रमासाठी सर्व देणगीदार ज्यांनी मोठ्या मनाने मदत केली, तसेच अनुनाद व सक्षम फाऊंडेशन, मुंबई यांनी सहकार्य केले, त्यांचे मनपूर्वक आभार. या दिवाळी उपक्रमांतर्गत १०० महिला आणि मुलांना* राशन वाटप करण्यात आले.
यावेळी पूजा खांडेकर, सुगम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. धन्यवाद
मंथन फाउंडेशन
#ManthanFoundation #DiwaliJoy #WomenEmpowerment #CommunityLove #SpreadHappiness



