पिंपरी चिंचवड - वुई टूगेदर फाउंडेशन नेहमीच निस्वार्थी सेवेचे कार्य करत असते, प्रत्येक दिवाळीला कष्टकरी,वंचित घटकांसाठी वेग वेगळे उपक्रम करीत असतात. यावर्षी असाच एक वेगळा उपक्रम म्हणजे कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करण्याचा मानस केला.
या उपक्रमासाठी वुई टूगेदर फाउंडेशन मधील अनेक पदाधिकारी, सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमात कष्टकरी महिलांना सन्मान म्हणून दिवाळी फराळ, मिठाई, रोख रक्कम, पणती, दिवे अशा प्रकारची मदत केली.
यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या अनेक भावना व्यक्त केल्या हा उपक्रम करताना वुई टूगेदरचे सर्व पदाधिकारी, सदस्य अगदी मनापासून निस्वार्थी सेवा म्हणून हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यात पुढाकार घेतला.
मंथन फाउंडेशनच्या आशा भट्ट -वेलणकर कायदेतज्ञ मनीषा महाजन या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला — त्यांच्या माणुसकीला मान द्या - आशा भट्ट वेलणकर
------- आम्ही लालबत्ती एरिया बुधवार पेठ पुणे येथील फीमेल सेक्स वर्कर्स मध्ये काम करतो, त्या सुद्धा माणूस आहेत. त्यांनाही स्वप्ने आहेत, त्यांनाही मुले आहेत. जर तुम्ही कधी रेड लाइट एरियातील त्यांचे जीवन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नसेल, त्यांचा संघर्ष, वेदना आणि माणुसकी अनुभवली नसेल तर कृपया फक्त ऐकलेल्या गोष्टींवर किंवा चित्रपटांवर आधारित होऊन त्या महिलांबद्दल गैरसमज करू नका. बदल घडवण्यासाठी नेहमी मोठे पाऊल उचलणे गरजेचे नसते. छोटे-छोटे प्रयत्नही त्यांचे जीवन सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी बनवू शकतात. ------
अनेकदा अंधश्रद्धांच्या नावाखाली महिलांना आर्थिक फसवणुकीचे बळी व्हावे लागते. - ॲड. मनिषा महाजन
----- महिलांनी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आपण सत्य आणि वास्तवावर आधारित निर्णय घेऊ शकतो. आरोग्यावर परिणाम: अंधश्रद्धांमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.------
वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी प्रस्ताविक केले व फाउंडेशनची कायम निस्वार्थी समाजपयोगी कार्य व समाजहीत उपक्रम आदी उपस्थिताना सविस्तर माहिती दिली.
फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे -सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सहसचिव मंगला डोळे -सपकाळे, सल्लागार रवींद्र सागडे,खजिनदार दिलीप चक्रे, लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, सोनाली दारासिंग मन्हास, क्रांतीकुमार कडुलकर, रवींद्र साबळे,जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद, धनंजय मांडके, उधळमकर, अनिल शिंदे,खुशाल दुसाने, दारासिंग मन्हास,अपर्णा कुलकर्णी, सदाशिव गुरव, अनिल पोरे, मधुकर वाडेकर, रमाकांत उजळूम कर, उल्हास दाते, शंकरराव कुलकर्णी, नंदकुमार वाडेकर, विलास गटने, श्रीराम दाते, दिलीप पेटकर, जयवंत राऊत, झाकीर सय्यद, आसावरी बच्चे, आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.
सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.






