पिंपरी चिंचवड - आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच मातंग समाज बांधव व बहुजन समाजाच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पर्वाच्या आयोजनासंदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, यमुनानगर येथे बैठक पार पडली.
बैठकीचे पिठासीन अधिकारी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे होते. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार उभे होते. मतदान प्रक्रियेनंतर गणेश नरसिंग कलवले यांची एकमताने प्रबोधन पर्व अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी मा. अध्यक्ष भगवान शिंदे, नाना कसबे, संजय ससाने, अरूण जोगदंड, युवराज दाखले, डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, सुनिल भिसे, अशाताई शहाणे, माजी अध्यक्ष संजय धुतडमल, बाबासाहेब पाटोळे, सा.लो. आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, नानासाहेब कांबळे, शिवाजी चव्हाण, भाऊ कसबे, विशाल कसबे, अविनाश शिंदे, शंकर खवळे, शिवाजीराव खडसे, मंगेश डाखोरे, अविनाश गायकवाड, सचिन दोनघव, अरूण लोंढे, ओमकार गायकवाड, विजय डोंगरे, स्वप्निल वाघमारे, अनिल तांबे, नाथा शिंदे, सागर कांबळे, आनंद कांबळे, यशवंत ससाने, कृष्णा वाघमारे, कैलास पाटोळे, भारतीताई चांदणे, वैशाली जाधव यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
