पिंपरी चिंचवड - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पिंपरी-चिंचवड शहर समिती तर्फे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ (दत्तवाडी–आकुर्डी) येथे निर्धार बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १४ तसेच इतर प्रभागांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.
बैठकीत पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे यांनी बोलताना सांगितले की, प्रभागात केलेले जनकार्य, कामगार–कष्टकरी व मध्यमवर्गीय मतदारांचा पाठिंबा आणि पक्षाची संघटनशक्ती यांच्या जोरावर पक्ष निश्चितच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मतदार यादी तपासताना काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
आकुर्डी शाखा सचिव अॅड. अमिन आर. शेख यांनी प्रभाग क्रमांक १४ मधील स्थानिक समस्या व निवडणूक रणनीती यावर सविस्तर मांडणी केली.
बैठकीचा समारोप पिंपरी-चिंचवड शहर सचिव कॉ. सचिन देसाई यांनी केला.
या बैठकीस कॉ. गस्ते, कॉ. सतीश नायर, कॉ. अविनाश लाटकर, कॉ. विश्वनाथन, कॉ. पोन्नप्पन, प्रसाद जगताप, अनिकेत मोरे, आदर्श पांडे, कृष्णा दिवाकर, मुकेश अंबटवार, कृष्णा अंबटवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
