पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) च्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) येथे इंटरनॅशनल रिलेशन्स सेल आणि एसीएम - डब्ल्यु यांच्या सहकार्याने दिवाळी निमित्ताने "ट्रेक ऑर ट्रिट हॅलोविन" उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्धघाटन पीसीसीओईआर चे संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी केले.
जागतिक संस्कृती ची देवाण घेवाण करणारा हा उपक्रम महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय विभागाने साजरा केला. या कार्यक्रमात हॅलोवीन ट्रेक ट्रिव्हिया, ग्लिच द लूक कॉस्च्युम कॉन्टॅस्ट आणि द हॉन्टेड हंट फॉर द हॉन्टेड हंट यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ही पार्टी थ्रिलर, रोमांचक झाली होती. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी सहभाग घेतला होता.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
