नेहरूनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष कार्यालयचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड - रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नेहरूनगर येथे अ.नगरचे खासदार निलेश लंके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे राष्ट्रवादीचे नेते राहुल दादा कलाटे,सुलक्षणा शीलवंत, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, उद्योजक युनूस भाई शेख, अरुण पवार,मुनाफ भाई तरासगार,काँग्रेसचे चंद्रकांत लोंढे, माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडू अस्मा इमरान शेख. एडवोकेट संतोष शिंदे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक अनिल चौधरी, मोहन ननवरे, बिबीशन पालखी, समाजसेविका माया सावंत. कुलदीप खरात उपस्थित होते.
यावेळी बोलताना अ.नगरचे खासदार निलेश लंके साहेब म्हणाले, लोकसभा निकालानंतर पिंपरी चिंचवड शहरातील लोक आमच्या पक्षात येण्यासाठी मागे लागले होते. आम्ही त्यांना संधी देखील दिली. विधानसभा निवडणूक संपताच ते पक्ष सोडून पळून गेले. राजकारणात दिवस येतात जातात पण जो निष्ठा टिकवून राहतो जनता त्याच्या पाठीशी उभी राहते. सर्व निष्ठावंताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत जनता ही तुमची साथ देईल या दुमत नाही.
यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या. सत्ताधारी आणि निवडणूक आयोग यांच्या वतीने संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात मतदार याद्यात घोळ सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील प्रत्येक प्रभागातील नावे जाणून-बुजून दुसऱ्या मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात निवडणुका संदर्भात लोकांमध्ये असंतोष आहे. आशिच परिस्थिती चालली तर भारतात देखील बांगलादेश नेपाळ यासारखे लोक आंदोलन उभे राहतील याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
यावेळी बोलताना इमरान शेख म्हणाले "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. विरोधकांकडे जरी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त असली तरी आमच्या पक्षाकडे मतदारांची संख्या जास्त आहे. विचारधारेवर एकनिष्ठ राहणाऱ्यां कार्यकर्त्यांना जनता नक्कीच महापालिका सभागृहात पाठवेल.
युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवक पदाधिकाऱ्यांनी दुचाकी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाली.त्यानंतर ग्रामदैवत खराळ आई मंदिर,अजमेरा येथील दत्त मंदिर, मासुळकर कॉलनी येथील तुळजाभवानी मंदिर याचे दर्शन घेऊन. दुसर रॅली यशवंत नगर चौकातील बुद्ध विहार, संतोषी माता मंदिर दर्शन घेऊन नेहरू पुतळ्यास अभिवादन करत श्री- जी कॉम्प्लेक्स नेहरूनगर जवळ कार्यक्रम ठिकाणी पोहोचली. या कार्यक्रमास नेहरूनगर खरळवाडी अजमेरा भागातील नागरिक आणि युवक मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

