आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील मरकळ मधील श्री केशवराज शिक्षण संस्थेचे पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये आधुनिक काळात आपली लोकनृत्य कला जपली जावी. ती नवीन पिढी पर्यंत पोहोचावी. या उदात्त हेतूने पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रांगणात 'श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धेचे' पहिले वर्ष मोठ्या उत्साहात पार पडले. शाळेचे प्राचार्य मिलिंद नखाते व सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १२ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. स्पर्धा दोन गटात उत्साहात झाली.
श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धेचा निकाल विजेते गट पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले.
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी) प्रथम क्रमांक अॅपेक्स इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली, द्वितीय क्रमांक नवीन माध्यमिक विद्यालय, मरकळ, तृतीय क्रमांक पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल, मरकळ यांचा समावेश आहे.
लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) प्रथम क्रमांक किड्स पॅराडाईज स्कूल, आळंदी, द्वितीय क्रमांक लर्निंग ट्री स्कूल, वराळे, तृतीय क्रमांक पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूल मरकळ यांचा समावेश झाला आहे.
बक्षीस वितरण मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात झाले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये रोख व करंडक असे पारितोषिक देण्यात आले. ८ वी ते १० वी गटासाठीचे बक्षीस मरकळ गावचे सरपंच हनुमंत लोखंडे यांनी दिले. लहान गटासाठीचे १० हजार रुपये बक्षीस उद्योजक जयसिंगराव लोखंडे यांनी दिले. पारितोषिक वितरण समारंभास सचिव श्री.के.शि.संस्था राहुल जनार्धन शिंदे, डायरेक्टर, स्नेहा प्रीकास्ट प्रवीण चौधरी, संचालक के.शि.संस्था तुकाराम वहिले, संचालक,खेड ता. खरेदी विक्री संघ किरण लोखंडे, उपसरपंच बाळासाहेब लोखंडे, संचालक श्री.के.शि.संस्था शंकरभाऊ लोखंडे, एकनाथ वरपे, नवीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्या छाया लाटे, पर्यवेक्षक शंकर जाचक, सर्व
विभाग प्रमुख नवीन उच्च माध्यमिक विद्यालय संतोष आव्हाळे मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पवन्सूत इंग्लिश मीडियम स्कूलने या स्पर्धेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
