Mumbai Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 2331 जागांसाठी भरती

Mumbai High Court Bharti Recruitment for 2331 posts under Bombay High Court

Bombay High Court Recruitment 2025 :

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत सन 2025 साठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, विविध संवर्गातील एकूण 2,331 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीमध्ये लघुलेखक (उच्च श्रेणी) 19 पदे, लघुलेखक (निम्न श्रेणी) 56 पदे, लिपिक 1,332 पदे, वाहनचालक (स्टाफ-कार-ड्रायव्हर) 37 पदे तसेच शिपाई/हमाल/फरश 887 पदांचा समावेश आहे. या भरतीमुळे राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, टायपिंग किंवा वाहनचालक परवाना आदी अटी वेगवेगळ्या असून, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 16,600 रुपयांपासून ते 1,77,500 रुपयांपर्यंत आकर्षक वेतनमान देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून, मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही भरती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयीन कार्यालयांसाठी असून, अर्ज शुल्क ₹1000 इतके निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

---------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

---------------------------------------------------------------

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

थोडे नवीन जरा जुने