पुणे – भारतातील प्रसिद्ध लाईफ कोच तसेच आध्यात्मिक मार्गदर्शक, संजिव मलिक (Self Awakening Mission चे संस्थापक व संचालक) यांच्या “Smiling Yogi” या एकदिवसीय प्रेरणादायी लाईव्ह सेशनचा पुणे येथे उत्साहात आणि यशस्वीपणे समारोप झाला.
हे सेशन २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडले. दिवसभर चाललेल्या या सत्रात ध्यान, प्राणायाम, आत्मचिंतन, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचार यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन Self Awakening Mission यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. संपूर्ण सत्रात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव सहभागीांना मिळाला. अनेक सहभागीांनी या अनुभवातून मानसिक शांती, भावनिक स्थैर्य आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याचे सांगितले.
या सेशनमुळे २०० हून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडल्याचे आयोजकांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले – पूर्णिमा महिंद्रा, उर्जिता जाधव, शुभांगी आणि निखिता शहा.
या सत्राचा मुख्य उद्देश प्रत्येकाला “Smiling Yogi” आणि “Smiling Yogini” बनण्यासाठी प्रेरित करणे हा होता.
हा उपक्रम पुणे शहरात आध्यात्मिक जागरूकता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश पोहोचवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

