भाई वैद्य एक प्रगल्भ विचार - पुरुषोत्तम सदाफुले

 


पिंपरी चिंचवड दि .२ - समाजवादी विचारवंत माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे चिंचवड येथे भाई वैद्य आणि कामगार या विषयावर मार्गदर्शन झाले. भाई वैद्य यांनी मोठ-मोठे पदे भूषवून सुद्धा त्यांच्यातले सामान्यपण कधी गेलेलं नाही, निरपेक्ष भावनेतून उतुंग काम केले भाई वैद्य आणि पिंपरी चिंचवडचे मोठे नाते होते भाई वैद्य एक प्रगल्भ विचार होते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी  केले.

यावेळी श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार कवी प्रभाकर वाघोले, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, राजेश माने, शारदा तांबे, शीतल अनुसे, नौसीन तांबोळी, सुमैय्या पठाण अंबिका घुमटे, शिला सरदार, निलावती पचारे, पूजा वाशीमकर, अशोक पोळ 

बाबासाहेब खराडे, धनाजी लिमकर, सुनील जाधव आदी सह कामगार उपस्थित होते.

सदाफुले पुढे म्हणाले, समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते भाई वैद्य हे आयुष्यभर सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता  मूल्यांसाठी संघर्ष करत राहिले. भाई यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम केले, अमिनेशन फॅक्टरी येथे त्यांनी संघटनात्मकरित्या काम करून कामगारांना न्याय दिला, कामगारांच्या हातात मोठी ताकद आहे, पाणी वाहत जाते ते नदीत गेले की गंगाजळ होते ते आपल्या हातात आले की तीर्थ होते त्यामुळे कामगारांचे हात श्रेष्ठ आहेत. कामगारांच्या ताकदितून असेच राज्य बलशाही घडवू या असे ते म्हणाले. तसेच बाजीराव सातपुते यांनीही भाई वैद्य यांचे अनुभव उपस्थितांना सांगितले.

थोडे नवीन जरा जुने