!-- afp header code starts here --> ६,०४५ रिक्त जागांसाठी पीसीसीओई मध्ये भव्य रोजगार मेळावा

६,०४५ रिक्त जागांसाठी पीसीसीओई मध्ये भव्य रोजगार मेळावा

 


पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात “पीसीसीओई जॉब फेअर २०२६” चे आयोजन 

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग (पीसीसीओई), निगडी, पुणे येथे शनिवारी, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता “पीसीसीओई जॉब फेअर २०२६”  चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अँप्रेन्टीसशिप ट्रेनिंग  (बीओएटी), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओ (माटीपीओ),आणि ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन (एआयमाटीपीओ) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी नोकरी, अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपच्या मोठ्या संधी उपलब्ध असणार आहेत अशी माहिती पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

   या जॉब फेअरमध्ये डिप्लोमा, बीई, बीटेक, बीएससी, बीसीएस, बीसीए, बीए, बीकॉम, बीबीए, बीफार्म, एमबीए, आयटीआय तसेच इतर विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सहभाग होण्याची संधी मिळणार आहे. २०२६ बॅचचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, २०२७ बॅचचे प्री-फायनल वर्षातील विद्यार्थी तसेच जून, जुलै २०२५, २०२४, २०२३, २०२२ आणि २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील या जॉब फेअरसाठी पात्र असतील. उमेदवारांना नोकरी, अप्रेंटिसशिपच्या व इंटर्नशिपच्या  संधी उपलब्ध होणार आहेत.

   या जॉब फेअरच्या आयोजनासाठी पीसीइटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच बोट चे संचालक पी. एन. जुमले, उपसंचालक एन. एन. वडोदे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे.

            या जॉब फेअर मध्ये कमिन्स इंडिया, जॉन डिअर इंडिया, दाना इंडिया, पियाजिओ व्हेईकल्स,  प्रीमियम ट्रान्समिशन, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, सँडविक, फियाट इंडिया यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांसह सुमारे १०० कंपन्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

  आतापर्यंत सुमारे ७० कंपन्यांनी या जॉब फेअर साठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सुमारे ६,०४५ रिक्त पदांसाठी मुलाखती होतील. या जॉब फेअर मध्ये डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे ४,३०० रिक्त पदे आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी, अप्रेंटिसशिप व इंटर्नशिप साठी सुमारे १,७४५ रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत.

या जॉब फेअरच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर नोंदणी करावी : 

https://tinyurl.com/JOBFAIR2026StudentRegistration

या जॉब फेअरच्या आयोजनासाठी पीसीइटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. दीपक वाघ, प्रा. हीना शर्मा, प्रा. डेन्झेटा लोबो, प्रा. पायल काळे, मंगेश काळभोर यांच्यासह २०० हून अधिक विद्यार्थी व प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. 

थोडे नवीन जरा जुने