PCMC : स्वच्छता आपली आपल्या घराची आपल्या परिसराची

 


 आपल्या नगराची , आपल्या प्रभागाची, आणि शहराची"

अतिशय महत्त्वाचा विषय आहे. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सातत्याने चालू ठेवण्याची ती प्रक्रिया आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याला रोज वेळेवर जेवण लागतं, वेळेवर नैसर्गिक विधी होत असते, यात आपण कोणती जर वेळ पाळली नाही तर आपल्या आरोग्य हे बिघडले समजायचे आणि मग त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि शेवटी मृत्यूच्या दारात व्यक्ती लवकर जाते. साठी आपल्या  दैनंदिनी सवयी  वेळेवर व्हाव्यात, याची गरज जशी आहे. तशीच स्वच्छतेची ही गरज तशीच आहे. नुसते प्रशासनास जबाबदार धरून चालणार नाही. त्यात नागरिकांचा सहभाग असणे हे अवश्य आहे. येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाका. ओला सुका कचरा वेगवेगळा करून टाका. परंतु वर्षानुवर्ष सांगून उपयोग नाही प्लास्टिकच्या पिशवीत उरलेले अन्न भरायचे ते रस्त्यावर टाकायचे. दुसरी गोष्ट जी गोष्ट आपण खात नाही खाऊ शकत नाही अशी खराब झालेली गोष्ट आपण जेव्हा भिकाऱ्यांना देतो तेव्हा ते भिकारी आपल्या जवळून घेतात, आणि ते रस्त्यावर टाकून देतात. 

 मग ते कुत्र्यांच्या माध्यमातून परिसरभर पसरते.मग भिकाऱ्यांना द्यायचेच असेल तर चांगल्या वस्तू द्या. खाण्यास योग्य अशा वस्तू द्या हा विषय वेगळा. लोकप्रतिनिधींचा सहभाग कसा असावा. आपल्या आपल्या वस्तीत मोकळ्या जागेवर वर्षानुवर्षीच्या गाड्या लागलेल्या आहेत याची पाहणी करा आणि  त्या बेवारस गाड्या संबंधित विभागाच्या माध्यमातून उचलून नेण्याची व्यवस्था लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झाली पाहिजे. तसेच कोणतीही पोस्टर अनाधिकृत लागता कामा नये. अधिकृत पोस्टर लावून त्याचा कार्यकाल संपल्यावर ती पोस्टर वेळेवर निघणे हे गरजेचे आहे लोकप्रतिनिधींनी यावर बंदोबस्त केला पाहिजे सार्वजनिक जागेवर कोणत्याही प्रकारची जाहिरात लागणार नाही.

यासाठी संबंधित जाहिरात दारांच्या वागण्याला बंधन घालण्यासाठी पालिकेतून काही नियम करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींचे स्वच्छते विषयी लोकांना मार्गदर्शन होणे हे अतिशय गरजेचे आहे. जेथे स्वच्छता आहे तेथे सौंदर्य आहे तेथे आरोग्य आहे तेथे लक्ष्मी आहे हा साधा नियमित आपण आपला प्रभाग चांगला कसा राहील यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासकीय सेवा आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्री माध्यमातून आपल्याला यथायोग्य नियोजन करता येईल. एक व्यक्ती समाजसेवक म्हणून इतके काहीच करू शकत नाही. त्याला आपल्या सर्वांची साथ असणे गरजेचे आहे. 


चला तर मग आपण सर्व मिळून स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊया.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत नंबर एकचे शहर आपल्या कृतीतून करूया*

यशवंत कण्हेरे 

अध्यक्ष कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच महात्मा फुले नगर चिंचवड पुणे १९

थोडे नवीन जरा जुने