आळंदी (अर्जुन मेदनकर) : पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान आणि समाजामध्ये बजावलेली महत्त्वाची सामाजिक जबाबदारी ही सर्वसामान्य नागरिकांनसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. पत्रकारांच्या याच गौरवशाली कार्याची दखल घेऊन तक्षशिला बुद्ध विहार समिती, आळंदी देवाची यांच्या वतीने रविवारी (१९ एप्रिल) विशेष सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तक्षशिला बुद्ध विहार (पोलीस स्टेशन समोर) संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रांतील पत्रकारांचा त्यांच्या कार्याबद्दल शाल, श्रीफळ व लेखणी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला:
श्रीकांत बोरावके: पत्रकार ( अध्यक्ष हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका ), अर्जुन मेदनकर ज्येष्ठ पत्रकार ( कार्याध्यक्ष हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका ) दिनेश कुऱ्हाडे पत्रकार (नवनियुक्त कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, पुणे जिल्हा) महादेव पाखरे (ज्येष्ठ पत्रकार ), ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या वतीने अत्यंत उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर रंधवे, विश्वनाथ थोरात, प्रवीण रंधवे, आनंद रणदिवे, सुभाष भोसले, विनायक गायकवाड, नामदेव सुरपल्लीकर, बाळासाहेब दादू भोसले, भिमराव थोरात, नितीन थोरात, अशोक थोरात, बाळासाहेब पोपट भोसले, संजय रंधवे, प्रशांत रंधवे, प्रभानंद शेलार, प्रमोद भालेराव व चारूदत्त रंधवे यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयु आनंद रणदिवे यांनी सांगितले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. सत्काराला उत्तर देताना सन्मानार्थींनी तक्षशिला बुद्ध विहार समितीचे आभार मानले व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आश्वासन दिले. या वेळी आळंदी संविधान जागर अभियान उपक्रमाची पत्रके संविधान जागर अभियान आळंदीचे प्रमुख अर्जुन मेदनकर यांचे हस्ते वाटप करीत संविधान जनजागृती करण्यात आली. यावेळी आळंदीतील विधायक विकास कामे मार्गी लावण्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही सत्कारमूर्तींनी दिली.
