​कल्याणकारी मंडळ हे रिक्षा चालकांच्या संघर्षाचे फळ: डॉ. बाबा कांबळे,


​गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा करून कल्याणकारी मंडळ मिळवून दिल्याबद्दल चाकण येथे डॉ. बाबा कांबळे व सहकाऱ्यांचा सत्कार

​चाकण येथे रिक्षा चालक-मालकांचा जनजागृती मेळावा संपन्न

​चाकण: रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि संघर्षाला यश आले आहे. हे मंडळ म्हणजे रिक्षा चालकांनी दिलेल्या लढ्याचे आणि त्यागाचे कष्टाचे फळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी केले.

​चाकण येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत (खेड-चाकण विभाग) वतीने 'कल्याणकारी मंडळ स्थापना' आणि 'मुक्त रिक्षा परवाना बंद' झाल्याच्या निर्णयाबद्दल जल्लोष व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना डॉ बाबा कांबळे बोलत होते.

​संघर्षाची गाथा आणि आवाहन:

डॉ. बाबा कांबळे पुढे म्हणाले की, "महामंडळासाठी आम्ही अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले आणि लाठ्या-काठ्याही खाल्या. या प्रदीर्घ संघर्षात रिक्षा चालकांनी दिलेली भक्कम साथ मोलाची ठरली. आता महामंडळ स्थापन झाले आहे, तरी सर्व रिक्षा चालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने नोंदणी करावी."

​स्थानिक समस्यांवर चर्चा:

प्रास्ताविक भाषणामध्ये खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांनी चाकण आणि खेड तालुक्यातील वाढत्या रिक्षा संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. "अधिकृत रिक्षा स्टँड नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, तरी शासनाने या भागात तातडीने अधिकृत रिक्षा स्टँड मंजूर करावेत," अशी मागणी त्यांनी केली. 

चाकण महानगरप्रमुख कैलास नाना वलांडे यांनीही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षा स्टँडला मंजुरी मिळणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड,

​म्हणाले महाराष्ट्र रिक्षा पंचायती संघटना संघर्ष करणारे संघटना आहे घटनेच्या संघर्षामुळेच आपल्याला कल्याणकारी मंडळ मिळाले आहे, 

युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी रिक्षा चालकांना महामंडळाचे फॉर्म कसे भरायचे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि मिळणारे फायदे यावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. "फॉर्म भरताना कोणतीही अडचण आल्यास ९०६७२२५१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, सर्व अडचणी सोडवल्या जातील," असे आवाहन शुभम तांदळे यांनी केले.

​उपस्थित मान्यवर:

या मेळाव्याला पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड, खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम तांदळे, चाकण महानगरप्रमुख कैलास नाना वलांडे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, डी मार्ट रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम, खेड तालुका कार्याध्यक्ष राजूभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुरज ठोंबरे, सरचिटणीस सुरज कड, आळंदी-मळकर विभाग अध्यक्ष अशोक ठाकूर, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार, आळंदी विभाग अध्यक्ष संदीप कुरुंद, मीनानाथ कानडे अतुल नाणेकर, विकास त्रिकोणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्षपदी विशाल ससाने यांची, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब शेलार यांची, निवड करण्यात आली, डी मार्ट रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आणि श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघाचे अध्यक्ष, सुनील कदम यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत मध्ये प्रवेश केला.

​कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी संयोजक,  अनिकेत कड, रमेश थोरात, निलेश गाडे, रतन कांबळे , नितुल शिंदे, रामदास टाकवे, नितीन गाडे, संकेत व्यवहारे, नितीन जाधव, हर्षद ठाकूर, रोहित कांबळे, रुपेश कांबळे, विशाल कांबळे, किरण कड, आकाश सरकुले, या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक माहितीसाठी संपर्क 

महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे ९०६७२२५१३१,

खेड तालुकाध्यक्ष सुनील जाधव, 8087045353,

थोडे नवीन जरा जुने