मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरलेला ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वास्तव, अध्यात्मिक संदेश आणि भावनिक कथानकामुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
अनेक प्रेक्षकांच्या मते ‘देऊळ बंद 2’ हा केवळ चित्रपट नसून श्री स्वामी समर्थांचा प्रसाद असल्याची भावना निर्माण होत आहे. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि अध्यात्मिक ऊर्जा प्रेक्षकांना अंतर्मुख करत असून अनेकांनी चित्रपट पाहिल्यानंतर सकारात्मक अनुभव व्यक्त केले आहेत.
चित्रपटातील दमदार अभिनय, ग्रामीण जीवनाची वास्तववादी मांडणी तसेच श्रद्धा आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम यामुळे प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचे फलक झळकत असून सर्व वयोगटातील प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
सोशल मीडियावरही ‘देऊळ बंद 2’ विषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून “हा सिनेमा म्हणजे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे,” अशा भावना अनेक भक्त व प्रेक्षक व्यक्त करत आहेत. अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा प्रभावी मिलाफ असलेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शब्दांकन : किशोर थोरात
