!-- afp header code starts here --> आळेफाटा येथे ओळख श्री ज्ञानेश्वरी संस्कारक्षम उपक्रम

आळेफाटा येथे ओळख श्री ज्ञानेश्वरी संस्कारक्षम उपक्रम

 


 जय हरी माऊली नामजयघोषात प्रारंभ 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीतून सुरु झालेला शालेय मुले सुशीक्षीत, सुसंस्कृत व संस्कारक्षम व्हावीत या साठी चा उपक्रम श्रीक्षेत्र आळेफाटा व आळेगाव या येथील ५ शाळांसह खराबवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमांचा हरिनाम जयघोषात प्रारंभ करण्यात आला.

  या प्रसंगी ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे, ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवारातील घटक तुकाराम अण्णा गवारी, प्रा. श्रीधर घुंडरे, निघोजे शाळा व्यवस्थापन समिती प्रमुख काळुराम येळवंडे, ह.भ.प. प्रल्हाद महाराज भोईभार यांचेसह शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षक,आदी उपस्थित होते. 

  नवीन शैक्षणिक वर्षात ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवारात उपक्रम सुरु करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ज्ञानेश्वर वस्ती, आळे, श्री ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळे,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा, श्री ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी तालुका खेड या ६ शाळांत हा उपक्रम हरिनाम गजरात सुरु करण्यात आला. नैतिक संस्कार व मूल्य शिक्षणाचे आधुनिक काळात असलेली गरज व त्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत उपक्रमाची शाळांत आवश्यकता असल्याचे सांगितले. 


  या उपक्रमाचे निमित्त शाळांचे व्यवस्थापन समिती, संस्था पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी, व ग्रामस्थ यांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत करीत उपक्रम स्वीकारला. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात देखील शालेय मुलांना शालेय शिक्षणा सोबत संस्काराची जोड देण्याची ग्वाही या उपक्रमातून देण्यात आली. ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील संतोष दिघे यांचे या उपक्रमास मोठे सहकार्य मिळाल्याने त्याचे आभार ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने व्यक्त करण्यात आले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा, शालेय संस्कारक्षम साहित्य ग्रंथ संपदा शाळांना भेट देत मुलांना हरिपाठाचे वाटप हरिनाम गजरात करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने