पिंपरी चिंचवड : दृष्टीदान पंधरवडानिमित्त 'स्वरांजली म्युझिकल परिवारा' तर्फे आयोजित केलेल्या सांगितिक कार्यक्रमातून स्व आशा भोसले यांना स्वरांजली दिली. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३६० जणांची मोफत तपासणी केली. स्व आशा भोसले यांना आदरांनी म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रा ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आकुर्डी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ अंजली कुलकर्णी, सुनील मांडवकर, सचिन गवळीकर तेजस भगत यांनी केले होते.
यावेळी गायक जयश्री चव्हाण आनंद गायकवाड लीना जोशी सोनल वाणी दीप्ती देशपांडे वैशाली सोनवणे शैलेंद्र पाटील स्वाती पाटील,अमराजा आरास, डॉ किरण देशकर,गायत्री रानाळकर, निवृत्ती महाजन, उमेश भोसले, आदम जमादार, सुनिल जोशी, पराग कामत, जहांगीर पठाण, गणेश ओहल,जयश्री दीक्षित, पंकज कथलकर, सचिन गवळीकर, डॉ मैथिली,मनूश्री यांनी स्व. आशा भोसले यांची एकापेक्षा सरस अशी गाणी सादर केली.
यावेळी गायकांनी सादर केलेल्या " आ देखे जरा ,झुमका गिरा रे ,लेकर हम दिवाना दिल ,दिल चीज क्या है ,प्यार मे दिल पे ,दम मारो दम ,याई रे याई रे ,ताकी ताकी ताकी रे ,इशारो इशारो मे , एक मैं और एक तू ,हवा के साथ साथ, या गाण्याला रसिकांचा टाळयांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी गायकांना अतुल लोंढे, अमन (कीबोर्ड), शिवाजी घोडे( सॅक्सोफ़ोन),रोहित साने( ढोलक),प्रवीण जाधव( पॅड) या वादकांनी साथ संगत केली.
यावेळी सुमारे ₹२८,००० किमतीच्या ३५० जणांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला . यामध्ये संपूर्ण रक्त तपासणी: रक्तातील पेशी, साखरेचे प्रमाण,रक्तदाब : हृदयाचे, संपूर्ण नेत्र तपासणी, दात आणि संपूर्ण मुख तपासणी, ३६महिलांची स्तनाच्या कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) केली .
रक्त तपासणीमध्ये सीबीसी कोलेस्टे्रोल,बीआय, शुगर, बी 12/ डी 3 या चाचण्या केल्या.
118 जणांची नेत्र तपसणी केली. त्यात रेफरक्टिव फंडस फोटोग्राफी / नोपण कॉन्टॅक्ट टोनयोमेटरी या सारख्या आधुनिक तपासण्या केल्या
या कार्यासाठी समर्थ युवा फौंडेशन आणि दिव्यदृष्टी आय फौंडेशन ,सनफार्मा यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी औंध जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमा दरम्यान लकी ड्रॉ द्वारे रसिकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाथरे यांनी केले.

