!-- afp header code starts here --> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवरील पोलिसी हिंसाचाराचा निषेध

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवरील पोलिसी हिंसाचाराचा निषेध


Cockroach Janata Party : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे पोलिट ब्युरो जंतर-मंतर येथे संसद मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या हजारो विद्यार्थी आणि तरुणांचे अभिनंदन करते. हा मोर्चा Cockroach Janata Party च्या आवाहनावर आयोजित करण्यात आला होता आणि विविध विद्यार्थी संघटनांनी त्याला पाठिंबा दिला होता. महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनात उत्तरदायित्वाच्या तत्त्वावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. या प्रचंड जनसमुदायाने मोदी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला चोख प्रत्युत्तर दिले, असे पोलिट ब्युरोचे मत आहे.

पोलिट ब्युरो दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या पोलिसांच्या लाठीमार आणि अश्रुधूराच्या वापराचा तीव्र निषेध करते. पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केल्यामुळे अनेक विद्यार्थी, तरुण आणि इतर नागरिक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गोले मार्केट येथील CPI(M) च्या मुख्यालयासमोरही लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर करण्यात आल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

NEET परीक्षांचे आयोजन करणारी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) बरखास्त करावी आणि प्रश्नपत्रिका फुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी, या मागण्यांसाठी देशभरात महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनाला मोदी सरकारने प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर संसद मोर्चाच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला, असे निवेदनात म्हटले आहे.

उपोषण आणि आजची पोलिस कारवाई ही देशभरातील नव्या आंदोलनांची ठिणगी ठरली आहे, असा दावा करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढता गोंधळ आणि बेरोजगारीच्या गंभीर समस्यांबाबत उत्तरदायित्व स्वीकारण्याऐवजी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यास नकार दिला, अशी टीकाही करण्यात आली आहे.

CPI(M) ने केंद्र सरकारला इशारा दिला आहे की अशा दडपशाहीच्या उपाययोजनांमुळे विशेषतः युवकांमध्ये वाढत असलेला संताप आणि असंतोष दाबून ठेवता येणार नाही शेवटी, पोलिट ब्युरोने केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, NTA बरखास्त करावी आणि अटक करण्यात आलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने