सलग 10व्या वर्षी घरकुलमध्ये पाण्याचा शिरकाव,सलग तिसऱ्या दिवशी प्रशासनाचे दुर्लक्ष - संतप्त नागरिकांचे चेरी चौकात (स्पाईन रोड) आंदोलन सुरू

 

पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरात सतत सुरू असलेल्या  मुसळधार पावसामुळे चिखली येथील घरकुल प्रकल्पात तीन ते पाच फूट  सांडपाणी शिरले आहे.

 रविवारी रात्री सुरू झालेल्या तुफानी पावसाने स्पाईन रोडच्या  सलग्न वसाहती पासून पावसाचे पाणी ( स्टॉर्म वॉटर) आणि सांडपाणी प्रकल्पातील पाणी घरकुल मध्ये शिरले. इमारतींच्या तळमजल्यावर पाणी शिरले विद्युत व्यवस्था बंद   झाली. प्रत्येक इमारतीमध्ये सात मजले आहेत. सरासरी 150 पेक्षा जास्त घरकुले असल्याने येथे दाट लोकवस्ती आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात.



तुंबणाऱ्या पाण्यामुळे दैनंदिन दिनचर्या तसेच महिला आणि मुलांना शुद्ध पाणी पुरवठा तसेच इलेक्ट्रिसिटी इ अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. गेली दहा वर्षे येथील हा तुंबणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन दुर्लक्ष करत आहे.पर्यायी सुविधा न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रहिवाशांनी  महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 





आज सकाळी सर्व घरकुल रहिवाश्यांनी चेरी चौक, निगडी भोसरी रोड येथे संतप्त निदर्शने करून प्रशासनास तातडीने लक्षवेध केला आहे. या आंदोलनास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
थोडे नवीन जरा जुने