डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची वाहतूक उपायुक्त कार्यालयात यशस्वी बैठक;
साह्य पोलीस आयुक्त डॉ, विक्रांत देशमुख, आणि पोलीस निरीक्षक अमित धुमाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली...
पिंपरी-चिंचवड / पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालय येथे एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ऑनलाईन टू-व्हीलर टॅक्सी सेवांच्या मुद्द्यावर या बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने यावर तात्काळ कठोर पावले उचलत आरटीओ (RTO) आणि वाहतूक विभागामार्फत संयुक्त विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे कायदेशीर आश्वासन दिले आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे व कायदेशीर घडामोडी:
१. राष्ट्रीय सुरक्षा व परदेशी नागरिकाचा अवैध वावर:
वाकड (पिंपरी-चिंचवड) परिसरात नेपाळ देशातील एका नागरिकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे, किंवा व्यावसायिक परवाना नसतानाही तो टू-व्हीलर टॅक्सी चालवत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार स्थानिक ऑटोरिक्षा व कॅब चालकांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.
२. मुंबई गोळीबार प्रकरण आणि सुरक्षेचा प्रश्न:
मुंबईतील जुहू परिसरातील गुन्हेगारी प्रकरणात (गोळीबार घटना) संबंधित आरोपी हा ऑनलाईन टू-व्हीलर टॅक्सी सेवेमध्ये 'रॅपिड रायडर' म्हणून कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. कोणतीही पार्श्वभूमी पडताळणी (Police Verification) न करता अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना व्यावसायिक वाहने चालविण्यास देणे सार्वजनिक सुरक्षेला व कायदेशीर चौकटीला मोठा धोका निर्माण करत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले.
३. प्रशासनाचे कठोर कारवाईचे आश्वासन:
डॉ. बाबा कांबळे यांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मुद्यांवर पोलीस प्रशासनाने सकारात्मक चर्चा करत, पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना व नियमबाह्य सुरू असलेल्या टू-व्हीलर टॅक्सी सेवांवर तातडीने व कठोर संयुक्त कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
बैठकीस उपस्थित शिष्टमंडळ:
या शिष्टमंडळात डॉ. बाबा कांबळे यांच्यासह राजन नायर (राष्ट्रीय प्रवक्ता, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया), कलिंदर शेख ,(प्रसिद्धीप्रमुख, महाराष्ट्र रिक्षा पंचायत), शुभम तांदळे (महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष), अनिल शिरसाट (रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रमुख), धनंजय कुदळे (राज्य प्रवक्ते), विशाल ससाने (पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष) रंजीत शहा, पुणे जिल्हा अध्यक्ष कष्टकरी कामगार पंचायत, तसेच बापू कांबळे, अमोल शिंदे, सोमनाथ तिकोटे, संभाजी सावंत, अरुण कांबळे, अशोक जगताप, ज्ञानेश्वर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
"रॅपिड कंपनीने बेकायदेशीरपणे सुरू केलेली टू-व्हीलर टॅक्सी बंद झालीच पाहिजे आणि ऑटो-टॅक्सी चालकांना शासकीय दराप्रमाणे न्याय्य भाडे मिळालेच पाहिजे, यासाठीचा आमचा लढा असाच सुरू राहील," असा ठाम इशारा या वेळी शुभम तांदळे यांनी दिला.यांनी यावेळी दिला आहे.
अधिक माहितीसाठी शुभम तांदळे मो+919067225131,
युवक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत,
