!-- afp header code starts here --> भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी मधुकर बहिरू बच्चे यांची नियुक्ती

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी मधुकर बहिरू बच्चे यांची नियुक्ती

 


PCMC 

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे महामंत्री मधुकर बहिरू बच्चे यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मधुकर बच्चे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कार्यालय प्रमुख संजय परळीकर, तसेच मनोज ब्राह्मणकर, विशाल वाळुंजकर, अजय पाताडे, संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे, जोशना कलाटे, मनीष पंजाबी, हर्षदा मोरे, राजश्री शहा यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने