पिंपरी चिंचवड : ताथवडे-वाकड परिसरात दिनांक 27/07/2026 रोजी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात संतापाची लाट उसळली आहे.
दिवसेंदिवस शहरात महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे घडलेल्या अशाच घटनेतील आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली आहे. तरीही अशा घटना पुनःपुन्हा घडत असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मा. पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदन देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आमच्या ठाम मागण्या:
1. तात्काळ अटक व कठोर कलमे: या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर POCSO कायदा 2012 नुसार कठोर कलमे लावावीत.
2. फास्टट्रॅक खटला: या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कमाल शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा.
3. पीडितांना मदत: पीडित कुटुंबाला तात्काळ वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन व शासकीय व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
4. सुरक्षा व्यवस्था: शहरातील शाळा, वस्त्या व निर्जन भागात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त, CCTV आणि "निर्भया पथक" सक्रिय करावे.
अशा नराधमांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात योग्य संदेश जाणार नाही. पीडितांना त्वरित न्याय मिळणे ही काळाची गरज आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, वरील प्रकरणी 7 दिवसांच्या आत कठोर कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आम्हाला कळवावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र रस्ता आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे सचिन चिखले MNS यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आज निवेदन देताना उपस्थित: छावा संघटनेचे धनाजी येळकर, मनसे चे राजु सावळे, सिद्धेश सोनकवडे, प्रबुद्ध कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सचिन चिखले
_शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना_
_पिंपरी-चिंचवड_
