MGID Header Code
Code End

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नजरकैद


मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा आज पिंपरी-चिंचवड दौरा आहे. हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो उद्घाटन आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय उद्घाटन या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.

नजरकैदेत ठेवण्यात आलेले पदाधिकारी:

वैजनाथ शिरसाट, शहराध्यक्ष, आप पिंपरी-चिंचवड - निगडी पोलीस स्टेशन येथे नजरकैद

कविता कोंडे देशमुख, शहर महिला अध्यक्ष - रावेत पोलीस स्टेशन / घरी नजरकैद

रविराज काळे, युवा प्रदेशाध्यक्ष - सांगवी पोलीस स्टेशन येथे नजरकैद

ऋषिकेश कानोटे - बावधन पोलीस स्टेशन येथे नजरकैद

विकी पासोटे, शहर युवक अध्यक्ष - रावेत पोलीस स्टेशन येथे नजरकैद

शिवकुमार बनसोडे, राजेश आडोळे - रावेत पोलीस स्टेशन येथे नजरकैद

अॅड. सुप्रिया गायकवाड, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष - पिंपरी पोलिसांकडून नजरकैद

यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनादेखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

यावेळी बोलताना आप शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट म्हणाले, "ही पोलिसांकडून केली जाणारी हुकूमशाही आहे. कोणतीही चूक नसताना नजरकैद करून ठेवणे हे कोणत्याही कायद्यात बसत नाही. तरीसुद्धा भाजप सरकारच्या काळामध्ये या गोष्टी होत आहेत. याचा अर्थ सरकारचे अपयश कुठेतरी लपवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत."

लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी नजरकैदेसारखा मार्ग अवलंबणे हे निषेधार्ह आहे. आम आदमी पार्टी या घटनेचा तीव्र निषेध करत आहे.

-  वैजनाथ शिरसाट

शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड

थोडे नवीन जरा जुने