!-- afp header code starts here --> आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 


आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.  

या वेळी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष देवाची सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशन सचिव रामदास दाभाडे, बाबूजी राजपाल, दत्तात्रय शिंदे, नितीन नाहाटे अहिर,  हमीद भाई शेख, सरला ताई, सुमन ताई, संगीता मुंगेकर, वृंदावन खेडकर, नवनाथ तिडके, स्वराज नाहाटे, चंदू भाऊ, पत्रकार महादेव पाखरे, दिनेश  कुऱ्हाडे पाटील, बाळकृष्ण रंधवे, रुखसाना शेख, संगीता मेटे, शीतल शेलार यांच्यासह जाणीव संघटना आळंदी सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. या अर्जुन मेदनकर म्हणाले, पथारी व्यावसायिक, विक्रेते यांचे अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. नगरपरिषद प्रशासनाने सर्व विक्रेते यांना समान वागणूक द्यावी. या साठी शिष्ठ मंडळ लवकरच त्यांची भेट घेईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी कार्य यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी त्यांचे विचार समजून घेऊन पुढे वारसा सुरू ठेवावा. असे त्यांनी आवाहन केले.  प्रास्ताविक व आभार सामाजिक कार्यकर्ते पथारी व्यवसायिक संघटनेचे प्रमुख सुलतान शेख यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने