!-- afp header code starts here --> आळंदी श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

आळंदी श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

  


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :  येथील “अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास दिंडोरी प्रणित केंद्रात“ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा उत्सव दिनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साही भक्तिमय वातावरणात धार्मिक परंपरांचे पालन करीत साजरा झाला. या केंद्रात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांची लगबग साधकांनी अनुभवली.  

    गुरु पौर्णिमा उत्सवात शोडशोपचार पूजा, भूपाळी महानैवेद्य, आरती, महानैवेद्य व आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

      गुरुपौर्णिमा महोत्सवाचे तयारीत गुरुपौर्णिमे निमित्त संपूर्ण केंद्र व बाहेरील परिसराचे स्वच्छता करण्यात आली. केंद्राच्या मुख्य दारासमोर सुंदर, रेखीव आकर्षक रंगीबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती. फुले –पाने यांनी आकर्षक सजावट करून रांगोळी लक्षवेधी झाली. संपूर्ण केंद्रात विद्युत रोषनाई व विविध आकर्षक फुल–पानांनी सजले होते. विविध फुलांचे हार व तोरणांनी संपूर्ण केंद्र सजवण्यात आले. उत्सवाचे मुख्य आकर्षण व धार्मिक विधी  गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता , श्रद्धा निष्ठा,भक्ती अर्पण करण्याचा पवित्र सोहळा साजरा करण्यात आला. 

     श्रींची महापूजा व अभिषेक श्री स्वामी  महाराजांच्या मूर्ती आणि पादुकांवर मंगलमय वातावरणात पवमान अभिषेक करण्यात आला. षोडशोपचार पूजा करून नयनरम्य सजावट करण्यात आली. महानैवेद्य आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाआरतीला आळंदी व आसपासच्या गावातील भाविक वर्ग, वेगवेगळ्या वयो गटातील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी आरती व महाप्रसाद तसेच दिवसभर सुरू असणाऱ्या विविध अध्यात्मिक सेवेचा लाभ घेतला. “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" आणि “श्री स्वामी समर्थ“ या मंत्राचा जयघोषाने संपूर्ण केंद्र परिसर दुमदुमून गेला. दिंडोरी प्रणित सेवा मार्गानुसार शेकडो सेवेकर्‍यांनी सामूहिक जप, आरती आणि गुरुपीठ पूजन विधी पूर्ण केला. दुपारच्या सत्रात आरती नंतर देखील उपस्थित सर्व स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. स्थानिक तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो सेवेकर्‍यांनी शिस्तीत दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमे निमित्त रात्री ८ पर्यंत स्वामी केंद्र भक्तांसाठी खुले ठेवले होते. 

गुरु पौर्णिमे निमित्त महानैवेद्य आरती व स्वामी महाराजांचे गुरुपद सेवा अतिशय उत्साहात  झाली .“श्री स्वामी समर्थ” या षडाक्षरी मंत्राचे जप व हवन सेवा  दिवसभरात संपन्न झाली “श्री स्वामी समर्थ चरित्र” पारायण सामूहिक वाचन हजारो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. सकाळच्या ३ आरती, सायंकाळची नारायणाची व गायत्री मातेची आरती, मंत्र पुष्पांजली, जयजय कार “सद्गुरु नाथा हात जोडीतो“ प्रार्थना ,स्वामी माळ जप, ऐक्य मंत्र, प्रार्थना अशा विविध देवी– देवतांच्या  सेवा घेण्यात आल्या. गुरु पौर्णिमा या उत्सवात आळंदी केंद्र प्रतिनिधी, विविध विभाग प्रतिनिधी तसेच भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमे निमित्त आळंदी केंद्रात अतिशय उत्साहात सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत महानैवेद्य आरती व  गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा साजरा झाला.

थोडे नवीन जरा जुने