पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक १८ केशवनगर चिंचवड मधील अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, मातीचे ढीग, अस्वच्छता ओसांडून वाहत आहे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना नागरिकांनी संबंधित विषयाची माहिती देऊनहीं काहीही त्यावरती उपाययोजना नाही
अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या कटिंग करून गेल्या महिन्यापासून रस्त्यावरच पडून आहेत अनेक ठिकाणी कचरा सडून सडून दुर्गंधी निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य नक्कीच बिघडत आहे परंतु सध्या पालिका अधिकारी कर्मचारी यांना त्याचं काहीही घेणेदेणे नसल्याचे निदर्शनास येत आहे
कुठे कचरा आहे ,कुठे माती आहे कुठेआहे, घाण साचून दुर्गंधी कुठे पसरली आहे हे बघण्याचे काम संबंधित अधिकाऱ्याचे आहे त्यांनी स्वतः प्रभागात फिरून बघावे नक्की लक्षात येईल
काही दिवसांपूर्वी महापूर येऊन अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे अनेक सोसायटी चिखलमय झाल्या होत्या परंतु प्रशासनाची वाट न पाहता जवळपास सर्वच सोसायट्यांनी संबंधित गाळ घाण कचरा स्वतःहून स्वच्छ करून घेतलेला होता त्यामुळे कुठेही प्रशासनावरती अतिरिक्त भार आला नव्हता तरीही बाकीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्वच्छतेचे काम करायला पाहिजे तसे कुठेही झालेलं दिसत नाही
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची सर्व कल्पना दिलेली आहे परंतु बहुतेक त्यांना दुसरी अनेक काम असल्यामुळे या तक्रारीकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नसावा असं नागरिकांचं मत आहे
संबंधित अधिकारी वरिष्ठ यांनी नागरिकांच्या अत्यंत जवळच्या म्हणजेच आरोग्याचा विषय असल्यामुळे त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी व पुढे प्रभागात कायम स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.
नागरिक प्रतिक्रिया
गेला एक महिना झाला चार ते पाच ठिकाणी पावसाळी चेंबर मधील माती काढून ढीग लावून ठेवले आहेत त्यातील अर्धी माती पाण्यात वाहून गेली अर्धी तशीच दुर्गंधीयुक्त होऊन पडून आहे वारंवार सांगून सुद्धा कोणीही उचललेली नाही त्यामुळे पाणी तुंबणे व दुर्गंधी निर्माण झाली आहे.
संतोष फडके
नागरिक
आमच्या सोसायटीसमोर व अनेक ठिकाणी सुद्धा गेले अनेक दिवस झाले झाडांच्या फांद्या कट करून भर रस्त्यामध्येच , फूटपाथ वर पडले आहेत तक्रार करून सुद्धा उचलल्या गेल्या नाहीत त्यात किडे तयार होऊन आरोग्यास आणि निर्माण झाले आहे
- राजू कोरे
- नागरिक केशवनगर
