आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आळंदी नगरपरिषदेने दिलेल्या जागेतच स्मारक तत्काळ विकसित करण्याची मागणी नगरसेवक सुरेश नाना झोंबडे यांनी करत मोर्चास मार्गदर्शन केले.
आळंदीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक विकसित करण्यास नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र या जागेवर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश नगरपरिषदेस मिळाले. या प्रकरणी आळंदीतील समाज बांधवांनी नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढून स्मारक जागेचा प्रश्न प्राधान्याने हाताळून स्मारकाची जागा स्मारकास उपलब्ध करून देऊन तत्काळ स्मारक विकसित करण्याची मागणी करण्यात असली. स्टे उठविण्यास प्रयत्न केले जातील अशी ग्वाही या मोर्चेकरी समाज बांधव यांना नगरपरिषद बांधकाम विभाग प्रमुख मनीष गायकवाड यांनी दिली. असली, तरी अनेक वर्षांनंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे स्मारकाच्या जागेवरील न्यायालयीन स्थगिती तातडीने उठवून स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, तसेच सर्व मूलभूत व शासकीय बाबींची पूर्तता करून नियोजित साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन विकसित करावे, अशी मागणी सकल मातंग समाज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या मागणी संदर्भात संघटनांच्या प्रतिनिधींनी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने बांधकाम प्रमुख मनीष गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे खजिनदार तथा नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे, अध्यक्ष नानासाहेब साठे, सचिव सूर्यकांत खुडे, झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष लक्ष्मण सोनवणे, लहुजी योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम वेळेकर, लहू पारवे, लहुजी टायगर संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.
निवेदनात आळंदी नगरपरिषदेच्या नियोजित स्मारकाच्या जागेवरील न्यायालयीन स्थगिती तातडीने उठवून पुढील स्मारकाचे कामकाज सुरू करावे, तसेच नियोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या जागे वरील सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाचे काम गतीने विकसित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नसून सर्व बहुजन, शोषित आणि वंचित समाज घटकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन स्मारकासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल.
यावेळी प्रमुख मागण्या मध्ये
न्यायालयीन स्थगिती तातडीने उठवून स्मारकाचे काम सुरू करावे.
नियोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे काम गतीने विकसित करावे.
दर महिन्याला कामाचा प्रगती अहवाल जाहीर करावा.
स्मारकाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करावी.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास गाव, शहर, तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर नवगिरे, उद्योजक बाळासाहेब झोंबाडे, बाबू नांदे, विजय दिपके, धनराज सकट, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हावडे, अजय मिटकरी, मनीष कांबळे, राहुल बाजार, आदित्य गालफाडे, ऋषिकेश वाघमारे, कुमार शिंदे, सनी गवई, उद्योजक कुमार मगर, सुमित लांडगे, नेताजी लोखंडे, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळेपाटील, करण उमप, भानुदास मदने, धीरज कांबळे तसेच झोपडपट्टी सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे यांनी, अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम आणखी रखडू देणार नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला.
आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
