पिंपरी चिंचवड : ‘लोकहिताची कामे प्रामाणिकपणे, करणारा सनदी अधिकारी’ महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मुंढे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी, सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल.
भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक, निर्भीड आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची स्वतंत्र ओळख आहे. ‘लोकहिताची कामे प्रामाणिकपणे करणारा सनदी अधिकारी’ अशी जनमानसात त्यांची प्रतिमा आहे.
केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्वकर्तुत्वातून नावलौकिक प्राप्त केलेल्या, निवडक प्रेरणादायी अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे.
सध्या ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. ही नवी जबाबदारी स्वीकारताच त्यांनी भेसळविरोधी धडक कारवाई सुरू केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
आजच्या काळात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. समाजाने अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. या भावनेतूनच आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
