तरुण प्रोफेशनल्समध्ये मान आणि पाठदुखी का वाढते?

 

लॅपटॉपसमोर किंवा डेस्कवर सलग 8 किंवा त्याहून अधिक तास बसणे, चुकीची बसण्याची पद्धत, कमी हालचाल आणि चुकीच्या उंचीवर असलेली स्क्रीन यामुळे मान, खांदे आणि कंबरेवर ताण येऊ शकतो. यामुळे ‘टेक नेक’, पाठदुखी, स्नायूंचा ताण, थकवा, डोकेदुखी आणि मनगटाचा त्रास होऊ शकतो.

ऑक्युपेशनल थेरपिस्ट भारती जाजू यांच्या मते, एर्गोनॉमिक्स म्हणजे फक्त सरळ बसणे नव्हे; कामाचे वातावरण शरीराच्या गरजेनुसार तयार करणे आणि दिवसभर हालचाल वाढवणे महत्त्वाचे आहे.

उपयोगी 5 एर्गोनॉमिक साधने

एर्गोनॉमिक ऑफिस चेअर – योग्य लंबर सपोर्ट, समायोजित करता येणारी उंची आणि आर्मरेस्ट असलेली खुर्ची.

Height-adjustable standing desk – बसणे आणि उभे राहणे यामध्ये वेळोवेळी बदल करता येतो.

Monitor stand/arm – मॉनिटर डोळ्यांच्या पातळीवर ठेवण्यासाठी.

Laptop stand – लॅपटॉपची स्क्रीन वर उचलण्यासाठी; शक्य असल्यास स्वतंत्र कीबोर्ड वापरणे.

Ergonomic keyboard आणि mouse – हात आणि मनगट अधिक नैसर्गिक स्थितीत ठेवण्यासाठी.

रोजच्या सवयींमध्ये हे बदल करा

दर काही वेळाने उठून चाला आणि पोझिशन बदला.

पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि खांदे रिलॅक्स ठेवा.

स्क्रीन शक्यतो डोळ्यांच्या पातळीवर ठेवा.

कोपर साधारण 90–100° कोनात ठेवण्याचा प्रयत्न करा.

walking meetings शक्य असल्यास करा.

नियमित strength training आणि स्ट्रेचिंग करा.

पुरेशी झोप आणि recovery ला महत्त्व द्या.

सततचा मान/पाठदुखी, कडकपणा, वारंवार डोकेदुखी किंवा मनगटाचा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका.

थोडे नवीन जरा जुने