MGID Header Code
Code End

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पिंपरीत भव्य सह्यांची मोहीम संपन्न


महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड शहर

पिंपरी चिंचवड  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या सह्यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. केंद्रातील निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने हा एल्गार पुकारला असून, ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही मोहीम मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मनसेचे शहराध्यक्ष मा. सचिन चिखले, शिवसनेचे शहर प्रमुख मा. चेतन पवार,  रुपेश पटेकर, राजु अवसरे, बाळा दानवले, शिवसेना रोमी सिंधु  अक्षय शिंदे, तुषार सोनटक्के, सागर बहुले, प्रमोद अडसुळे, सतोंष यादव, दत्ता डांगे, प्रतिक कांबळे, वैभव फाळके, आकाश कांबळे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पुढील काळातही राज साहेबांच्या आदेशानुसार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

सचिन चिखले

शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पिंपरी चिंचवड शहर

थोडे नवीन जरा जुने