MGID Header Code
Code End

चिखली पोलीस ठाण्याचे गुन्ह्यात आरोपीस वीस वर्षाची सक्त मजुरी शिक्षा

 


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय  चिखली पोलीस स्टेशन 

PCMC : अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस 20 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

चिखली  पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. 609/2026, भादवी कलम 376(n),4(3). तसेच POCSO Act कलम 3(A ),4(3),2,J(2),N12 ,5(L),5(J)(॥) दाखल गुन्ह्यात मे.डी शिरभाते, जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पिंपरी चिंचवड जिल्हा सत्र न्यायालय यांनी आरोपी कुणाल पांडुरंग वावळे वय  30 वर्षे, रा. नेवाळे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड पुणे यास दोषी ठरवून 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हा दिनांक 15/12/2021 रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री रघुनाथ भोये यांनी करून तपास पूर्ण केल्यानंतर मा. न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते सदर प्रकरणाचे सुनावणी पिंपरी सत्र न्यायालयात चालू असताना कोर्ट कामकाज पाहणाऱ्या महिला पोलीस हवालदार माया कोल्हे यांनी सर्व साक्षीदारांना मा. न्यायालयात हजर ठेवले तसेच व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अमोल फडतरे यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन करून सदरची केस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याकडे दत्तक देण्यात आलेली होती. त्यांनीही सदर केसबाबत मा. न्यायालयात सतत पाठपुरावा केल्याने सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी  न्यायालयात होऊन दिनांक 14/10/2026 रोजी मा. न्यायालयाने निकाल जाहीर केला.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आरोपीस सी आर पी सी 235(2) प्रमाणे 

१)pocso 5(L),5 (J)(॥) मध्ये 20 वर्ष शिक्षा व 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम  करावास भोगावा लागेल

2) posco  11,12 मध्ये 01 वर्षे शिक्षा व 5000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 एक महिना सश्रम करावास भोगाव लागेल    वरील सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

सदर प्रकरणात  सरकारी अभियोक्ता श्री. प्रेमकुमार अगरवाल यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी मपोहवा माया हरिदास कोल्हे यांनी न्यायालयीन कामकाजात प्रभावी समन्वय साधला.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-4, श्रीमती श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त श्री. प्रवीण मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, श्री. रंणजीत जाधव तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अमोल फडतरे केसचे दत्तक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया प्रभावीपणे राबवून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने