स्वच्छतेच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महिला आरोग्य निरीक्षक , आरोग्य मुकादम यांची महत्त्वपूर्ण भूमिका
पिंपरी चिंचवड : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची नियमित स्वच्छता होणे आवश्यक असते. ही स्वच्छता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सफाई सेवकांचे नियोजन, कामावर देखरेख आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम या सांभाळत आहेत. स्नेहल सोनवणे, संतोषी कदम, स्नेहा चांदणे, स्नेहल सुकटे, कोमल फर्डे, रश्मी तुंडलवार, रूपाली साळवे, महिला आरोग्य मुकादम प्रमिला शिंदे, शिवगंगा नागरगोजे, रुक्मिणी बिनवडे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
शहरातील विविध भागांतील स्वच्छता कामांचे नियोजन करणे, सफाई कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे आणि कामकाजावर लक्ष ठेवणे, अशा जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. स्वच्छतेविषयक उपक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांना सातत्याने प्रयत्न करावे लागतात. दैनंदिन कामकाजातून शहरातील स्वच्छता

