MGID Header Code
Code End

वुई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने रोजंदारी आणि नाका कामगारांना फराळ, किराणा कपडे वाटप


पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण, सेक्टर १६ येथे वुई टूगेदर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने रोजंदारी, नाका कामगार कुटुंबियांना फराळ, किराणा किट, साड्या आणि कपडे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

रोजंदारी कामगारांना खात्रीशीर मासिक कमाई नसते.

यावेळी संस्थेचे सल्लागार रवींद्र सागडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नाक्यावर कामाच्या शोधात असलेल्या रोजंदारी कामगारांना खात्रीशीर मासिक कमाई नसते. शिक्षण आणि कौशल्याचा अभाव यामुळे त्यांना रोजंदारी अल्प कमाईत कुटुंब पोसावे लागते. दिवाळीचा सण आनंद आणि प्रकाशाचा असला, तरी अनेकदा आर्थिक अडचणी, वाढती महागाई यामुळे त्यांची दिवाळी कठीण परिस्थितीत जाते.

तुमची दिवाळी गोड व्हावी म्हणून-----

संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सांगितले की, वुई टूगेदर फाउंडेशनचे आम्ही सर्व पदाधिकारी निस्वार्थ सेवा आणि तुमची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही फराळ, एक महिना पुरेल इतका किराणा व कपडे देत आहोत. शहरात आम्ही गोरगरिबांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. ही  दिवाळी तुमच्या जीवनात नवा प्रकाश देईल.



हा कार्यक्रम दत्तमंदिर, चिखली प्राधिकरण राजे शिवाजीनगर येथील दत्त मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे ट्रस्टी आणि सामाजिक कार्यकर्ते  मा. दत्तात्रय  जगताप यांनी मंदिराचे प्रांगण कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार!

मोशी, चिखली येथील लाभार्थी कुटुंबीयांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेच्या दानशूर सदस्यांनी निधी गोळा केला होता.





आभार देणगीदार आणि सदस्यांचे --

दिनेश राजपूत, रवींद्र इंगळे, जावेद शेख,के रंगाराव, अपर्णा कुलकर्णी,अनिल शिंदे,अनिल पोरे, अमोल शिवभक्त, मंगेश महाशब्दे, किशोर जोशी, सीताताई  केंद्रे, सोनाली मन्हास, दारासिंग मन्हास, सदाशिव गुरव,सलीम सय्यद. दिलीप चक्रे,  एम.के. शेख, क्रांतीकुमार कडुलकर, दिलीप पेटकर, रवींद्र सागडे, रमाकांत, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, प्रा.दीपक जाधव, प्रा.वैशाली गायकवाड, प्रवीण मेहेंदळे,संध्या निमबर्गी, निलेश आवारे, मधुकर बच्चे, मंगला डोळे - सपकाळे, अभिजीत करंदीकर, श्रीनिवास जोशी,  मेघना बेरी,गणेश कांबळे,विशाल कुंडले, यांच्यातर्फे देणगी देण्यात आली.

 सर्व सर्व सभासदानी कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचन सलीम सय्यद, प्रास्ताविक जयंत कुलकर्णी यांनी केले. आभार रवींद्र काळे काळे यांनी मानले.

---------------

ADVT


---------

------------


-----------


---------- 



थोडे नवीन जरा जुने