जागतिक शांतीदूत परिवार संस्थेतर्फे २०२५ चा पुरस्कार
आळंदी (अर्जुन मेदनकर) : -संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, संशोधक ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर यांना जागतिक 'शांतीदूत परिवार' संस्थेच्या वतीने २०२५ चा मानाचा "शांतीदूत सेवारत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
पुणे येथे झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अप्पर पोलिस आयुक्त निखिल पिंगळे, जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह.भ.प. प्रशांत महाराज यांना "शांतीदूत सेवारत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
प्रशांत महाराज मोरे यांनी परदेशात आंतरराष्ट्रीय पातळी वरही संत विचार प्रसाराच्या कार्यासाठी सेवा रुजू केली. या सेवेच्या तसेच कीर्तन, प्रवचन, व्याख्यान विविध कार्यक्रमांचे माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार संत जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी समर्पित केला आहे. या पुरस्काराचे निमित्त त्यांचे आळंदीतील आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील आदी संस्थांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.