भारतातील उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करण्यासाठी कार्गो मोबिलिटीमध्ये नवीन युगाचा शुभारंभ
पुणे, २३ जून २०२५ : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने नवीन टाटा एस प्रोच्या लाँचसह नवीन टप्पा गाठला आहे, तसेच लहान कार्गो मोबिलिटीच्या परिवर्तनात्मक युगाचा शुभारंभ केला आहे. ₹3.99 लाख रूपयांच्या सूरवातीच्या किमतीसह टाटा एस प्रो भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी ट्रक आहे, जो अपवादात्मक कार्यक्षमता, अद्वितीय वैविध्यता आणि उच्च दर्जाचे मूल्य देतो.
उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला टाटा एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूईल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यवसाय गरजांसाठी योग्य सोल्यूशन निवडण्याची स्थिरता मिळते.
ग्राहक देशभरातील टाटा मोटर्सच्या १२५० कमर्शियल वेईकल्स विक्री टचपॉइण्ट्सपैकी कोणत्याही टचपॉइण्टमध्ये किंवा टाटा मोटर्सचे ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म फ्लीट व्हर्सवर त्यांचे पसंतीचे एस प्रो व्हेरिएण्ट बुक करू शकतात. टाटा एस प्रोच्या मालकीहक्काला सोईस्कर करण्यासाठी टाटा मोटर्सने आघाडीच्या बँका व एनबीएफसींसोबत सहयोग केला आहे, ज्यामधून विनासायास फायनान्सिंग सोल्यूशन्ससह त्वरित कर्ज मंजूरी, स्थिर ईएमआय पर्याय आणि सुधारित फंडिंग सपोर्ट देण्यात येईल. यासह ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता होण्याची खात्री मिळते.
एस प्रो लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, “लाँच करण्यात आलेल्या टाटा एसने भारतातील कार्गो मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणली. गेल्या दोन दशकांमध्ये या ट्रकने २५ लाखांहून अधिक उद्योजकांना यशस्वीरित्या सक्षम केले आहे, तसेच प्रगती व क्षमतेचे प्रतीक बनला आहे. नवीन टाटा एस प्रोसह आम्ही महत्त्वाकांक्षी भावी पिढीसाठी नवीन उद्देशासह हा वारसा अधिक दृढ करत आहोत. स्थिरता, सुरक्षितता आणि नफ्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या एस प्रोमध्ये उत्तम उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे, जो उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सुसज्ज असलेल्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यास मदत करेल.''
टाटा एस प्रोबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हल्दर म्हणाले, “उद्देशपूर्ण टाटा एस प्रो सखोल ग्राहक अभिप्रायांसह विकसित करण्यात आली आहे आणि विविध उपयोजनांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्ये, तसेच लाखो किलोमीटर अंतरापर्यंत या ट्रकची प्रखर चाचणी करण्यात आली आहे. मल्टी-फ्यूईल पर्याय, किफायतशीरपणा आणि सुधारित ड्रायव्हिंग क्षमतेसह टाटा एस प्रो विविध वापरांमध्ये उच्च दर्जाचे मूल्य देतो. आमच्या पोर्टफोलिओमधील हा धोरणात्मकरित्या भर करण्यात आलेला ट्रक आहे, जो उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना विश्वासार्ह, भविष्यासाठी सुसज्ज गतशीलता सोल्यूशन्ससह सक्षम करण्याप्रती टाटा मोटर्सच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. भारतातील व्यावसायिक, ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्स हब महाराष्ट्र एस प्रो बाय-फ्यूईल आणि ईव्ही व्हेरिएण्ट्ससाठी लाभदायी क्षेत्र आहे. या राज्यातील ग्राहक या ऑफरिंग्जचा फायदा घेण्यास अद्वितीयरित्या सज्ज आहेत, जेथे राज्यामध्ये प्रबळ सीएनजी पायाभूत सुविधा असण्यासोबत शाश्वत परिवहन सोल्यूशन्सना पाठिंबा देणा-यसा इलेक्ट्रिक गतीशीलतेचा लवकर अवलंब करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर अशी प्रमुख शहरे एफएमसीजी, फ्लीट लॉजिस्टिक्स, डार्क स्टोअर्स व पेय वितरण अशा क्षेत्रांमध्ये एस प्रो ईव्हीच्या फिक्स्ड-ड्युटी चक्रांसाठी विशेषत: अनुकूल आहेत, जेथे उच्च प्रमाणातील डिलिव्हरी नेटवर्क्ससाठी कार्यक्षमता व विश्वसनीयतेची आवश्यकता आहे. दरम्यान कोकण, विदर्भ व मराठावाडा या यासारख्या प्रांतांमध्ये कृषी-आधारित उद्योग आणि एमएसएमईची संपन्न परिसंस्था आहे. या क्षेत्रांमध्ये एस प्रोची उच्च लोड क्षमता, सुसंगत आकारमान आणि इंधन-कार्यक्षम ड्राइव्हट्रेन्स अरूंद रस्त्यांमधून नेव्हिगेट करण्यासाठी आणि लास्ट-माइल डिलिव्हरी ऑप्टिमाइज करण्यासाठी व्यावहारिक व लाभदायी सोल्यूशन देतात. महाराष्ट्रातील प्रगतीशील मोबिलिटी लँडस्केप आणि वैविध्यपूर्ण व्यावसायिक गरजांशी संलग्न होत एस प्रो ऑपरेशनल कार्यक्षमता, अनुकूला आणि दीर्घकालीन मूल्याचे लक्षवेधक संयोजन देते.''
अधिक सुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला ट्रक
अपवादात्मक पेलोड क्षमता
टाटा एस प्रो दर्जात्मक ७५० किलो पेलोड आणि वैविध्यपूर्ण ६.५ फूट (१.९८ मीटर) डेकसह नवीन मापदंड स्थापित करतो. फॅक्टरी-फिटेड लोड बॉडी पर्याय - हाफ-डेक किंवा फ्लॅटबेडसह उपलब्ध हा ट्रक विविध उपयोजनांमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा ट्रक कंटेनर, महापालिका उपयोजन आणि रीफर बॉडी फिटमेंटसाठी सुसंगत आहे. या ट्रकमधील उच्च क्षमतेचे चेसिस आणि शक्तिशाली अॅग्रीगेट्स अवजड लोड असताना देखील विश्वसनीय कार्यक्षमतेची खात्री देतात.
कार्यक्षम, वैविध्यपूर्ण पॉवरट्रेन्स
मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर निर्माण आणि लाभक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेला एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूईल आणि इलेक्ट्रिक व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे:
पेट्रोल: ६९४ सीसी इंजिन ३० बीएचपी शक्ती आणि ५५ एनएम टॉर्क देते, ज्यामध्ये पॉवर व इंधन कार्यक्षमतेचे संयोजन आहे.
इलेक्ट्रिक: टाटा मोटर्सचे प्रगत ईव्ही आर्किटेक्चर ३८ बीएचपी शक्ती, १०४ एनएम टॉर्क आणि सिंगल चार्जमध्ये १५५ किमीची रेंज देते, तसेच सर्व हवामानामध्ये विश्वसनीय ड्रायव्हिंगसाठी आयपी६७-प्रमाणित बॅटरी व मोटर आहे.
बाय-फ्यूईल: सीएनजीच्या किफायतशीर कार्यक्षमतेसह विनासायास कार्यसंचालनांसाठी ५-लिटर पेट्रोल बॅकअप टँकची स्थिरता आहे. सीएनजी मोडमध्ये हा ट्रक २६ बीएचपी शक्ती आणि ५१ एनएम टॉर्कची निर्मिती करतो.
आरामदायी, सुरक्षित केबिन
रस्त्यावर दीर्घकाळपर्यंत प्रवास करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या एस प्रोमध्ये एैसपैस जागा, कार-सारखी केबिनसह एर्गोनॉमिक सीटिंग, एैसपैस स्टोरेज आणि आधुनिक सोयीसुविधा आहेत. एआयएस०९६-प्रमाणित क्रॅश-टेस्टेड केबिनसह सुरिक्षततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. या ट्रकमध्ये अतिरिक्त ड्रायव्हर सोयीसुविधेसाठी डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि पर्यायी इन्फोटेन्मेंट सिस्टम देखील आहे.
स्मार्ट कनेक्टीव्हीटी आणि ड्रायव्हर असिस्टण्स
प्रगत एस प्रोला पूरक टाटा मोटर्सचे कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एज आहे, जे ८ लाखांहून अधिक नोंदणीकृत वेईकल्समध्ये आहे. हे प्लॅटफॉर्म वेईकल हेल्थ, ड्रायव्हरची ड्रायव्हिंग वर्तणूक आणि अंदाजात्मक मेन्टेनन्सबाबत रिअल-टाइम माहिती देते, ज्यामुळे वाहतूकदारांना सक्रिय सुरक्षितता निर्णय घेता येतात. गिअर शिफ्ट अडवायजर आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टण्स यासारखी वैशिष्ट्ये शहरामध्ये व ग्रामीण भागांमध्ये नेव्हिगेशन प्रभावी करतात.
अद्वितीय सपोर्ट आणि मालकीहक्क अनुभव
देशभरात २,५०० हून अधिक सर्विस व स्पेअर्स आऊटलेट्स, तसेच दुर्गम भागांमध्ये स्टार गुरू नेटवर्क असण्यासह एस प्रो सहजपणे तज्ञांची सहाय्यता उपलब्ध होण्याची खात्री देते. ईव्ही-संबंधित सर्विस सेंटर्स आणि प्रबळ २४x७ रोडसाइड असिस्टंट प्रोग्राम अपटाइम आणि मन:शांती देतात.