राष्ट्रवादी युवक तसेच शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड : शिव शाहू फुले आंबेडकर विचार धारेवर काम करणारे महाराष्ट्र राज्यातील मराठा व बहुजन समाजासाठी करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक, मराठा सेवा संघ छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मागणी केली गेली.
यावेळी बोलताना युवकशहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले "प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर तसेच मराठा समाजावर झालेला असून असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. या हल्ल्यास सरकार जबाबदार आहे.छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संघटनेच्या नावात आहे हे कारण पुढे करत हल्ला करणारा भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून खून खंडणी यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. भाजप पक्ष आपल्या संघटनेत प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन वाल्मीक कराड बनवण्याच्या तयारीत आहे का?
भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी, भाजपचे राज्यपाल कोश्यारी, प्रशांत कोरटकर, भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी याआधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले होते त्यावेळेस ह्या नामर्द्यांची शिवभक्ती कुठे गेले होती ?
जनसंघ, भाजप,आरएसएसचे पितामह असलेले गोळवळकर आणि सावरकर यांचे सहा सोनेरी पान आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली गेली आहे यावर भाजपचे गुंड मूग गिळून गप्प का बसले आहेत? पुरोगामी चळवळीच्या नेत्यांना वेगळा न्याय आणि भाजपच्या नेत्यांना वेगळा न्याय हे धोरण भाजप सरकार राबवत आहे का? सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर एखाद्या व्यक्तीची डॉ दाभोळकर गौरी लंकेश आणि कॉम्रेड पानसरे यांच्यासारखी हत्या करण्याचे षडयंत्र मनुवाद्यांच्या आहेत का? भाजप युवा मोर्चाच्या या दीपक काटेवर भाजप काही कारवाई करणार आहे का? असे संतप्त सवाल युवकशहराध्यक्ष इम्रान शेख यांच्याकडून केले गेले.
यावेळी मारुती भापकर म्हणाले "बहुजन समाजाच्या नेत्यांवर असले षडयंत्र करून केलेले हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. आणि हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते. राज्य सरकारचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर पुरोगामी चळवळ संपवण्याचा कट रचला जातोय का असा सवाल भापकर यांनी केला. तसेच सराईत गुन्हेगार असलेल्या दीपक काळे वर जन सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची विचार बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा काम प्रवीण दादा गायकवाड कित्येक वर्षापासून करीत आहेत. आणि पुरोगामी चळवळीतील एक मोठं नाव म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.
यावेळी छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील,राष्ट्रवादीचे देवेंद्र तायडे,नकुल भोईर,अरुण पवार,मराठा सेवा संघाचे जाधव सर,प्रियंका ताई बारसे,काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आरोपींवर कठोर कारवाई करत मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख, समाजसेवक मारुती भापकर.माजी नगरसेविका प्रियांका बारसे, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण कदम, सतीश काळे,अरुण पवार, सचिन निंबाळकर, मराठा सेवा संघाचे जाधव सर,नकुल भोईर, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे,
विशाल जाधव, राजू खंडगळे, राष्ट्रवादी युवकचे साकी गायकवाड, आश्रफ शैख, ओम क्षीरसागर, केतन होके साकिब शेख, प्रशांत जाधव, उमेश उदागे गणेश धावरे, दानिश अन्सारी रजनीकांत गायकवाड, गणेश देवराम, विकास कांबळे, भैया ठोकळ, अक्षय अरोडे,
समाधान अचलखांब, तनवीर अहमद, समीर सय्यद आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.