पिंपरी चिंचवड : चिंचवडगाव येथील स्व.बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेले दोन महिने नादुरुस्त म्हणून बंद होता.
महावितरण समिती सदस्य व वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे व भारत केसरी पै. विजय गावडे सोशल फाउंडेशन यांनी पालिका क्रीडा उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते, तलाव लवकर चालू न केल्यास उपोषण करणार होते.
पण त्या वेळी अधिकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या व थोडा वेळ द्या, अशी विनंती केली होती त्यामुळे बच्चे यांनी उपोषण करण्याचे स्थगित केले होते.
परंतु तलाव सुरु होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवल्यामुळे आज 15 जुलै रोजी सकाळी 6 वा मधुकर बच्चे, भारत केसरी पै. विजय गावडे, यांच्या हस्ते जलपूजन, नारळ फोडुन पहिली बॅच करण्यात आली.
त्यामुळे या तलावात पोहण्यास येणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले. अनेक पत्रकारांनी याचा पाठपुरावा घेतला. उपायुक्त पंकज पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्यात असणाऱ्या सर्व अडचणी अतिशय कौशल्याने दूर करीत सहकार्य केले.
उपस्थितांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.
लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, वुई टुगेदर फाउंडेशनचे सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी, दिलीप चक्रे,अनिल गावडे, दिनेश राजपूत, झाकीर सय्यद, नंदकुमार वाडेकर, विलास रासकर, अर्जुन पाटोळे, प्रमोद आढाव, दीपक तरडे, अतुल गुजर, झेंडे निलेश आवारे , तोष्णीवाल राऊत, संध्या मॅडम, वासंती काळे, आदी फाउंडेशन पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.