पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - भारताचा स्वातंत्र्यपूर्व लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत, साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि भक्ती शक्ती चौक, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,माजी अध्यक्ष नाना कसबे, सुनिल भिसे, अरूण जोगदंड, संजय ससाणे, सतीश भवाळ, नितीन घोलप, यादव खिलारे, मीनाताई खिलारे, विशाल कसबे, मारूती सोनटक्के, इंद्रजीत कांबळे, गणेश कापसे कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, विशाल भुजबळ तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
तर निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता शिवराज वायकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे, माजीअध्यक्ष नाना कसबे, सुनिल भिसे, मनोज तोरडमल, अरूण जोगदंड, रामदास कांबळे, डी.पी. खंडाळे, संजय ससाणे, नितीन घोलप, सतीश भवाळ, आण्णा कसबे, आशा शहाणे, केसरलांडगे सामाजिक कार्यकर्ते यादव खिलारे,मिना खिलारे, बाळासाहेब खंदारे, प्रा.डॉ.विजय सोनावले, मारुती सोनटक्के, गणेश कापसे, गणेश अवघडे, भानुदास साळवे, रामेश्वर बावणे, इंद्रजीत कांबळे, शिवाजी साळवे, अनिल कांबीकर, बालाजी कांबळे, रूपा कांबळे, नाना कांबळे, साहेबराव साळवे, बंडू चांदणे, नामदेव रिठे, विजय कांबळे, राजू जाधव, धीरज सकट, मधुकर रोकडे, सविता आव्हाड, ज्योती वैरागर,प्रसाद केसरे, बंडू कसबे तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध शाहीर बापू पवार यांनी "भारतभूषण अण्णाभाऊला- वंदन माझे लोकशाहीराला" "विजला ज्ञानाचा दिवा" तसेच "साज साहित्याचा रुसला ,१८ जुलै दिना - माझी मैना जवळ रडते,जरा बोला की आण्णा" अशा गीताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले