PCMC : क्विक हिल फाउंडेशन च्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा मोहिमे अंतर्गत प्रतिभा कॉलेजच्या विध्यार्थ्याची क्लब ऑफिसर म्हणून निवड

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा,  संचालिका तेजल शहा,  प्रभारी प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरीया,  क्वीक हीलच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आदीच्या उपस्थितीत  महाविद्यालयात बैठकीत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात प्रतिभा कॉलेज चिंचवड च्या वतीने क्वीक हिल फाउंडेशन बरोबर सांमजस्य करार केला असून या मोहिमे अंतर्गत अनेक जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत.

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या क्वीक हिल फाउंडेशनच्या उपक्रमासाठी प्रतिभा महाविद्यालयाच्या काही उत्साही व 

क्रियाशील विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे या विध्यार्थ्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हे विषयक जनजागृती, परिसंवाद, कार्यशाळा असे विविध  उपक्रम राबविले जाणार आहेत.

प्रतिभा महाविद्यालतील नेतृत्व गुण असलेल्या विद्यार्थांपैकी क्लब ऑफिसर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्याचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला.

यावेळी क्विक हिलचा अध्यक्षा अनुपमा काटकर यांचा हस्ते अधिकृत क्लब ची स्थापना झाली. हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी फाउंडेशनचे असोसिएट डायरेक्टर अजय शिर्के सर, सी एस आर एक्झिक्युटर गायत्री पवार - केसकर व दिपू सिंघ यांचे मार्गदर्शन मिळाले.

यामध्ये अध्यक्षपदी विद्यार्थीनी श्रावणी सामंत, सचिव पदी  आकाश ठाकूर, उपक्रम प्रमुख ओलीव वर्गिस, तर मीडिया प्रमुख म्हणून  मानसी वाडेकर हे पदभार सांभाळणार आहे.

शिक्षक समन्वयक म्हणून डॉ. हर्षिता वाच्छानी काम पाहणार आहेत.

क्वीक हिल फाउंडेशनच्या वतीने या मोहिमेचे प्रशिक्षण देखील विध्यार्थ्यांना देण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने