PCMC : प्रथम क्रमांकाबद्दल सफाई कामगारांचा सत्कार

 


पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महानगरपालिका ने स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली  असून केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या  स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला  याबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांचेकडून कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या हस्ते जे स्वच्छतेचे काम करतात ज्यांचे महत्वाचे योगदान आहे असे सफाई  कामगार यांना शाल पुष्प व पेढे  भरवून  अभिनंदन करण्यात आले.

शहरातील स्वच्छतेसाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या सफाई कामगार, सामाजिक संस्था आणि  पथ विक्रेते, जबाबदार नागरिक व आयुक्त शेखर सिंह व अधिकारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून हा क्रमांक मिळालेला असून याबद्दल नागरिकांची   पुन्हा जबाबदारी वाढली असून खऱ्या अर्थाने रात्रंदिवस स्वच्छतेचे सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना हे श्रेय जात आहे या कामगारांसाठी भरीव  आरोग्य विमा सह सुरक्षा साधने मिळणे  गरजेचे आहे .

थोडे नवीन जरा जुने