आंबेगाव : आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले, यांचे आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी व आदिवासी समाजासाठी विशेष योगदान आहे, त्यांनी दिलेले आदिवासी प्रश्नांवरचे लढे हे सतत प्रेरणा देणारे ठरावे यासाठी त्यांच्या नावाने मागील तीन वर्षापासून, स्मृती पुरस्कार,अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने नियमित दिला जात आहे. या पुरस्काराचे हे पाचवे वर्षे आहे.
या वर्षाचा आदिवासी सेवक शंकरराव विठू केंगले, स्मृती पुरस्कार हा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय अढारी व सामाजिक कार्यकर्त्या कॉ.अपर्णा दराडे यांना जाहीर झाला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विनोद निकोले हे असणार आहे तर प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद बोकील हे असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे व सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच डॉ.कविता वरे असतील.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद बोकील हे स्वराज्यातून समृद्धीकडे या विषयावर मांडणी करणार आहे. वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतून ज्यां आदिवासी गावांनी आपली वाटचाल ही स्वराज्यातून समृद्धीकडे केली आहे त्याबाबत ते विशेष करून बोलणार आहे.
गोष्ट मेंढा गावाची, पाचेगावची कहाणी या पुस्तकातून त्यांनी विदर्भात ज्या गावांनी या कायद्यांचा अवलंब करत आपली प्रगती साधली आहे. याविषयीची माहिती सर्वांसमोर आणली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून नक्कीच पेसा व वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करणे किती आवश्यक आहे याची जाणीव होईल अशी अपेक्षा किसान सभेचे पुणे जिल्हा सहसचिव अशोक पेकारी व तालुका सचिव रामदास लोहकरे यांनी व्यक्त केली आहे.
हा कार्यक्रम शनिवार दि.२०-९-२०२५ रोजी, दुपारी १२ ते ३ या वेळेत शंतनू मंगल कार्यालय, कोटमदरा फाटा येथे होईल अशी माहिती आंबेगाव तालुका,किसान सभेचे पदाधिकारी,राजू घोडे, नंदा मोरमारे, कमल बांबळे, देविका भोकटे, दत्ता गिरंगे, कृष्णा वडेकर, सुभाष भोकटे, अशोक जोशी, पुंडलिक असवले, मच्छिंद्र वाघमारे यांनी दिली.
Adivasi Sevak Shankarrao Vithu-Kengle-Memorial-Award-announced-for-Aparna-Darade-Vijay-Adhari