Heavy rain alert : मेघगर्जनेसह मान्सून परतीच्या वाटेवर

 


पुणे : यंदाचा मान्सून लवकरच परतीच्या प्रवासावर आहे. 15 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून परतीला सुरुवात झाली आहे, जी सामान्य वेळेपेक्षा तीन दिवस लवकर आहे.

 राज्यातील हवामान स्थिती

उत्तर तेलंगणा व लगतच्या विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र आहे. एक द्रोणीय पट्टा दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे मान्सून अजूनही राज्यात सक्रीय राहणार आहे.

 हवामान विभागाचे अलर्ट्स ऑरेंज अलर्ट (अति जोरदार पावसाची शक्यता): रायगड: पुढील दोन दिवस सलग पाऊस पडणार असून संपूर्ण कोकण रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि गोवा येथे मुसळधार पाऊस बरसणार आहे.

पुणे व सातारा (घाट विभाग): पुढील दोन दिवस, छत्रपती संभाजीनगर: आज मेघगर्जनानेसह पाऊस 

येलो अलर्ट (जोरदार पावसाची शक्यता व विजांचा कडकडाट):

संपूर्ण राज्यात: पुढील दोन दिवस ati पावसाचे आहेत. विशेषतः घाट विभागात पावसाची तीव्रता अधिक असू शकते.

पुणे शहराचा हवामान अंदाज

पुढील २ दिवस आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनेसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो — येलो अलर्ट जारी.

सावधगिरीसाठी सूचना:

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्याव्यात.

घाटमार्गांनी प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन हवामान लक्षात घेऊन करावे.


थोडे नवीन जरा जुने