विशेष लेख - नवीन घर खरेदी करताना ही काळजी घ्या, अन्यथा छोट्याशा चुकीने फसवणुकीला बळी पडाल - ॲड. अपर्णा आष्टीकर


नवीन घर घेताना जागेची निवड करण्यासोबतच सर्व कायदेशीर कागदपत्रे जसे की विक्री करार, भोगवटा प्रमाणपत्र, पूर्णत्व प्रमाणपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तपासा. घराची रचना, प्रवेशद्वार आणि खोल्यांची दिशा वास्तुशास्त्रानुसार असल्याची खात्री करा. तसेच, घराच्या सभोवतालच्या परिसराची पाहणी करा, ज्यामुळे कामावर जाण्याचा प्रवास, खरेदीसाठी लागणारे सोयी आणि भविष्यातील राहणीमानावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. 

घर घेताना किंवा जमीन विकत घेताना खूप गोष्टींची माहिती खरेदीदाराला हवी असते पण त्यांना या सगळ्या गोष्टी माहित आहेच असं नाही आणि त्यामुळे होणारी फसवणूक जास्त प्रमाणात दिसून येते .

प्रत्येक माणसाला त्याच एक स्वप्नातल घर हवं असतं किंवा स्वतःच्या मालकीची जागा हवी असते आणि ती विकत घेताना खूप गोष्टींची कायदेशीर बाबी बघायला पाहिजेत जसे की घर घेताना आपण नवीन प्रोजेक्ट मधील घर घेत असू तर काय पाहायला पाहिजे याची माहिती बघुया.

1. ज्या जागेवर प्रोजेक्ट होणार आहे ती कोणाची मालकीची आहे त्यावर कोणते litigation चालू आहे की नाही ते बघायला हवे.

2. जो बिल्डर तो प्रोजेक्ट बांधणार आहे तो RERA ने black list केलेला नसावा.

3. तो प्रोजेक्ट हा Rera sanction project आहे का हे बघायला पाहिजे

4. बिल्डर चे आधीचे कमीतकमी recent चे पाच प्रोजेक्ट तरी तपासून घ्यायला पाहिजे,

5. आपल्याला जो फ्लॅट दाखवत आहे तो sanction plan मध्ये दिसून येत आहे की नाही हे देखील पाहिले पाहिजे,

6. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या Agreement ने आपल्याला फ्लॅट विकला जाणार आहे ते Agreement नीट व्यवस्थित तपासून घेऊन सगळे त्यातील अटी व शर्ती तपासून घेणे आवश्यक आहे.

7. तसेच जे Agreement आपल्याला वाचायला दिले होते ते Agreement registered झालं आहे का ते तपासून घ्यायला पाहिजे

वरील सगळ्या गोष्टीची माहिती नीट तपासून व्यवहार करणे आवश्यक आहे.

तसेच Resale चा फ्लॅट विकत घेणार असाल तर खाली. नमूद गोष्टी बघणे आवश्यक आहेत,

1. Resale चा फ्लॅट विकत घेत असताना पूर्वी च्या घर मालकाचे सगळे ओरिजनल documents registered आहेत का नाही ते तपासून घेणे आवश्यक आहे,

2. जर पूर्वीच्या मालकाने घरचे ओरिजनल रजिस्टर्ड documents बँकेत लोन घेण्यासाठी गहाण ठेवले असतील तर त्याचे लोन संपले का ? आणि लोन  संपले असतील तर बँके कडून NOC मिळाली का हे तपासणे आवश्यक आहे. 

3. तसेच  resale च्या फ्लॅट च्या संदर्भात जाहीर नोटीस प्रचलित पेपर मध्ये प्रसिद्ध करणे देखील आवश्यक आहे.

4. Resale chya फ्लॅट संदर्भात सोसायटी अथवा अपार्टमेंट ऑफ असोसिएशन स्थापन झालं आहे का ? आणि झाले असल्यास फ्लॅट मालक त्या असोसिएशन चे सभासद आहेत का हे देखील तपासणे महत्वाचे आहे,

5.  तसेच फ्लॅट मालकाने फ्लॅट चे मेंटेन्स चार्जेस वेळा वेळी भरलेले भरले आहेत की नाही आणि भरलेले असल्यास फ्लॅट विकत असतांना सहकारी गृह रचना संस्था यांची NOC मिळणे आवश्यक आहे.

 जेव्हा फ्लॅट संदर्भात सपूर्ण registration process पूर्ण होईल त्या नंतर Original registed documents ,share certificate हे पूर्वीच्या मालकाने नवीन  मालकाला सदर फ्लॅट चे possession देताना handover करणे देखील आवश्यक आहे.

 लीगल सेल - वुई टूगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड

थोडे नवीन जरा जुने