पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टीने 'सेवा पंधरवडा' अभियानांतर्गत भव्य रक्तदान 'अमृत महोत्सव' शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे यांच्या हस्ते झाले. या वेळी २७५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबिराला अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, माजी महापौर उषाताई ढोरे, जिल्हा संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, आणि वैशालीताई खाडये यांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, भाजपा राज्य परिषद सदस्य पाटील चिंचवडे आणि धर्मेंद्र क्षीरसागर, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका उषाताई मुंढे,निर्मलाताई कुटे, आरतीताई चोंधे,अश्विनीताई चिंचवडे,माजी नगरसेवक विनायक गायकवाड,संदीप कस्पटे,विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी,मंडल अध्यक्ष अनिताताई वाळुंजकर,शिवराज लांडगे, धरम वाघमारे,मोहन राऊत, शहर पदाधिकारी उपाध्यक्ष राम वाकडकर,अमित पसरणीकर,रवी देशपांडे, कैलास सानप,खंडूदेव कठारे, राजा मासुळकर,राजेंद्र बाबर, बापू घोलप, युवराज लांडे, दीपक भोंडवे,अभिजित बोरसे, संजय परळीकर, कविताताई हिंगे, दिपालीताई कलापुरे, आणि प्रीतीताई कामतीकर यांचीही उपस्थिती होती.
या शिबिराच्या आयोजनात भारतीय जैन संघटनेचे प्रकाश गादिया आणि विरेश छाजेड तसेच तेरापंथी युवक परिषदेचे पंकज गादिया यांनीही सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे संयोजक जयदिप खापरे यांनी प्रास्ताविक केले, तर सहसंयोजक नामदेव पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि विनोद मालू यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा रक्तदान 'अमृत महोत्सव' यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.